JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘तू चूकीच्या माणसाशी पंगा घेतलास’; अभिनेत्याची सलमान खानला धमकी

‘तू चूकीच्या माणसाशी पंगा घेतलास’; अभिनेत्याची सलमान खानला धमकी

‘तुझं करिअर संपवल्याशिवाय शांत बसणार नाही’; अभिनेत्यानं घेतला सलमान खानशी थेट पंगा

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 12 जून**:** प्रसिद्ध चित्रपट समिक्षक, अभिनेता कमाल आर. खान (Kamaal R. Khan) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतो. तो सतत समिक्षणाच्या निमित्तानं देशातील राजकारणी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींवर टीका करत असतो. (Bollywood Celebrity) मात्र यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी मिळून केआरकेवर निशाणा साधला आहेत. (KRK) त्याच्याविरोधात मानहानिचे दावे ठोकले आहेत. परंतु या परिस्थितीत देखील केआरके मागे हटला नाही. तुम्हाला जे करायचं ते करा, स्वत:ची संपूर्ण ताकत लावा पण तुम्ही मला हरवू शकणार नाही असं आव्हान त्यानं या बॉलिवूड कलाकारांना दिलं आहे. “बॉलिवूडचा गुंड भाई तू एक गोष्ट लक्षात ठेव, मी भलेही आऊटसायडर आहे. पण मी सुशांत सिंह राजपूत नाही. ना मी आत्महत्या करणार ना बॉलिवूडला जिंकू देणार. यावेळी तुम्ही चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहे.”

HBD: 500 रुपये घेऊन मुंबईत आली होती दिशा पटानी; आज आहे कोट्यवधींची मालकीण “बॉलिवूडच्या गुंडांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही उत्तरप्रदेशवासी कधीच हार मानत नाही. आता तर आर पारची लढाई होईल. बॉलिवूडच्या ईतिहासात या लढाईचा उल्लेख केला जाईल. मी तुमच्या आव्हानाचा स्विकार करतोय.”

दिशा पटानी होती या अभिनेत्याच्या प्रेमात; समलैंगिकतेच्या आरोपांमुळं मोडलं लग्न “या बॉलिवूडच्या गुंडाला जर मी टीव्ही कलाकार नाही केला तर केआरके नाव लावणार नाही. ज्या दिवशी या गुन्हेगाराचं करिअर संपेल त्या दिवशी त्याचे चमचे देखील शांत बसतील. डुकरासारखे चेहरे असलेल्या या चमच्यांना लवकरच उत्तर मिळेल. आता या चमच्यांना भोकू देत.” अशा आशयाची सलग तीन ट्विट्स करुन केआरकेनं आपला राग व्यक्त केला.

प्रकरण काय आहे**?** केआरके चित्रपटाचं समिक्षण करताना अनेकदा कलाकारांच्या खासगी आयुष्याची खिल्ली उडवतो. यामुळं सलमान खाननं त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच्या या तक्रारीला मिका सिंगनं पाठिंबा दिला. मात्र त्याची ही कृती केआरकेला आवडली नाही. त्यानं सलमान खानचा पाळीव कुत्रा अशा शब्दात त्याची खिल्ली उडवली. या प्रकरामुळं मिका आणखी संतापला अन् त्यानं केआरके कुत्ता या गाण्याची निर्मिती केली. अन् या गाण्यावर बॉलिवूडमधील काही कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यामुळं केआरके आणखी संतापला अन् त्यानं बॉलिवूडविरोधात अप्रत्यक्ष युद्धच पुकारलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या