दिशा पटानी ही आज बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. एका चॉकलेटच्या जाहिरातीतून करिअरची सुरुवात केलेल्या दिशाचे आज लाखो चाहते आहेत.
2/ 11
‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून तिने पदार्पण केलं होतं. अन् अत्यंत कमी वेळात तिनं सिनेसृष्टीत स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली.
3/ 11
दिशाचा आज वाढदिवस आहे. 29 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
4/ 11
दिशाला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. परंतु तिच्या कुटुंबीयांना ही आवड फारशी आवड नव्हती. त्यामुळं शिक्षण अर्धवट सोडून ती अभिनेत्री होण्यासाठी मुंबईत आली होती.
5/ 11
मुंबईत आली तेव्हा तिच्याकडे केवळ 500 रुपये होते. या 500 रुपयांत तिला स्वत:चा खर्च भागवायचा होता. कुटुंबीयांची नाराजी पत्करुन आल्यामुळं त्यांच्याकडून तिला कुठलीच आर्थिक मदत मिळत नव्हती.
6/ 11
करिअरच्या सुरुवातीस तिला प्रचंड संघर्ष करावा लागला. एक लहानशी भूमिका मिळवण्यासाठी देखील तिला जागोजागी पायी फिरुन ऑडिशन्स द्यावी लागत होती.
7/ 11
दिशानं काही काळ मॉडलिंग देखील केलं होतं. ती सुंदर होती. त्यामुळं तिला एका चॉकलेटच्या जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली. या जाहिरातीमुळं तिचं नशीब एकाएकी बदललं.
8/ 11
या जाहिरातीमुळं तिला लोफर या तेलुगु चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली. अन् या चित्रपटातून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली.
9/ 11
लोफर हा चित्रपट फारसा चालला नाही. पण यामुळं दिशासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले. तिला ‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या बिग बजेट बॉलिवूडपटात काम करण्याची संधी मिळाली.
10/ 11
अन् त्यानंतर ती बागी, मलंग, राधे यांसारख्या अनेक बिग बजेट चित्रपटात झळकली. आज ती बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.
11/ 11
अन् त्यानंतर ती बागी, मलंग, राधे यांसारख्या अनेक बिग बजेट चित्रपटात झळकली. आज ती बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.