मुंबई, 14 जुलै : ‘कॉफी विथ करण’ चा सातवा सीझन (Koffee with Karan season 7) सुरु झाला आहे. या सेलिब्रिटी चॅट शोमध्ये अनेक कलाकार सहभागी होतात. करण जौहर त्यांना प्रश्न विचारुन त्यांची अनेक गुपितं बाहेर आणत असतो. डिस्ज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर याचा पहिला एपिसोड नुकताच रिलीज झाला. या एपिसोडमध्ये करण जोहरसोबत रणवीर सिंह आणि आलिया भट्ट हे दोघे उपस्थित होते. या शोच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये सारा आणि जान्हवी सहभागी होणार असून हा एपिसोड 14 जुलैला प्रदर्शित होणार आहे. दुसऱ्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून दुसऱ्या भागासाठी सगळेच खूप आतुरतेनं वाट पाहत आहेत. या एपिसोडमध्ये जान्हवी आणि साराचे बीएफएफ गोल्स सगळ्यांना पहायला मिळणार आहे. त्यामुळे दोघींविषयी काय काय गोष्टी बाहेर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हेही वाचा - Anvita Phaltankar: ‘पावसात कुठे फिरायला जायला आवडेल?’, स्वीटूने पटकन घेतलं याठिकाणाचं नाव या शोमध्ये चांगल्या मैत्रिणी असलेल्या गौरी खान, महीप कपूर आणि भावना पांडे देखील एकत्र दिसणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे शोची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. करण जौहरसोबत शाहरुख खान आणि गौरी खानचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे या शोमध्ये जर त्यांची उपस्थिती असेल तर आर्यन खानशी संबंधीत ड्रग्ज प्रकणाविषयी बोलू शकतात. त्यामुळे करण याविषयी प्रश्न विचारणार का आणि गौरी खान याविषयी काही बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘बॉलीवूडलाइफ’ मधील एका अहवालात असे म्हटले आहे की, ती तिच्या कुटुंबाला तिच्या मुलासोबत आलेल्या त्रासदायक अनुभवाबद्दल सांगू शकते. याविषयी अद्याप चर्चाच आहे. याविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. हेही वाचा - Amruta Khanvilkar Husband : अमृतानं पहिल्यांदाच सांगितली नवऱ्याविषयीची ही गोष्ट आर्यन खान ड्रग्ज प्रकरण देशभरात चांगलंच गाजलं होतं. मुंबईत सापडलेल्या ड्रग्जमध्ये आर्यन खानचं नाव आलं होतं. त्यानंतर त्याला 28 दिवस तुरुंगात काढावे लागले होते. मात्र आता आर्यनची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे. नुकतेच न्यायालयाने त्याचा पासपोर्टही परत करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, यंदाच्या कॉफी विथ करण शोमध्ये बॉलिवूडशिवाय पहिलांदाच दाक्षिणात्य कलाकारही पहायला मिळणार आहे. यामध्ये समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडाचं नाव समोर आलंय. त्यामुळे हा सीझन आणखीनच खास होणार आहे.