अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या 'चंद्रमुखी' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. अमृतानं नुकतंच Etimes शी बोलताना तिच्या गुरुविषयी सांगितलं. यावेळी तीनं तिचा नवरा हिमांशुचा उल्लेख केलेला पहायला मिळाला. गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत अमृता खानविलकरनं म्हटलं की, माझे गुरु हे माझे पती आहेत. 'मला जीवनात सतत पाठिंबा देणारा आणि मार्गदर्शक करणारा माझा पती हाच माझा गुरु आहे', असं अमृतानं म्हटलं. तो अत्यंत शिस्तप्रिय आहे. याशिवाय तो त्याच्या तत्त्वांवर आणि त्याच्या गोष्टींवर नेहमी ठाम असतो. माझ्या वैयक्तिक जीवनात आणि व्यावसायिक जीवनात निर्णय घेताना त्याचा खूप मोठा पाठिंबा असतो. हिमांशु ज्याप्रकारे मला समजून घेतो, मला नाही वाटत दुसरं कोणी समजू शकेल, असंही अमृतानं म्हटलं. अमृता आणि हिमांशुनं अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. अमृता आणि हिमांशु दोघेही सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. दोघेही अनेकवेळा एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर कर