JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘माझ्यासारखं काम करा, मग मानेन’; किर्तीनं दिलं बॉलिवूड अभिनेत्रींना आव्हान

‘माझ्यासारखं काम करा, मग मानेन’; किर्तीनं दिलं बॉलिवूड अभिनेत्रींना आव्हान

“मसालेपटात तर कोणीही काम करु शकतं पण माझ्यासारखं काम करुन दाखवा तर मानेन” असं आव्हानच जणू तिने बॉलिवूड अभिनेत्रींना दिलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 8 जुलै**:** किर्ती कुल्हारी (Kirti Kulhari) ही एक प्रयोगशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिनं आजवर पत्नी, प्रेयसी, क्रांतीकारक, खलनायिका अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. (Kirti Kulhari movie) वेब सीरिज असो की चित्रपट ती नेहमीच आपल्या अनोख्या अभिनयशैलीद्वारे प्रेक्षकांना अवाक करण्याचा प्रयत्न करते. मात्र इतकी इतकी क्षमता असून देखील किर्तीचं नाव आघाडिच्या अभिनेत्रींमध्ये का घेतलं जात नाही? असा प्रश्न वारंवार केला जातो. या प्रश्नाचं उत्तर आता स्वत: किर्तीनं दिलं आहे. “मसालेपटात तर कोणीही काम करु शकतं पण माझ्यासारखं काम करुन दाखवा तर मानेन” असं आव्हानच जणू तिने बॉलिवूड अभिनेत्रींना दिलं आहे. बॉलिवूडला आणखी एक धक्का; हॉरर चित्रपटाचे निर्माते कुमार रामसे यांचे निधन किर्तीनं स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं बॉलिवूड अभिनेत्रींना अप्रत्यक्ष आव्हानच दिलं. ती म्हणाली, “बॉलिवूड ही अत्यंत पठडीबाज इंडट्री आहे. यामध्ये प्रामुख्याने मसालेपटांचीच निर्मिती केली जाते. या चित्रपटात अभिनेत्रींकडे सुंदर दिसण्याशिवाय करण्यासारखं काहीच नसतं. परंतु मी जे करु शकते ते या अभिनेत्री करु शकत नाही. कारण त्या भूमिकांमध्ये तुम्हाला अभिनय करावा लागतो. जीव ओतून काम करावं लागतं. या आघाडिच्या अभिनेत्रींनी माझ्यासारखं काम करुन दाखवावं मग मी त्यांना मानेन.” 3 वेळा लग्न करणारी अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई; चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव किर्तीने आजवर ‘पिंक’, ‘उरी- द सर्जीकल स्ट्राईक’, ‘इंदू सरकार’ अशा अनेक हीट चित्रपटांत काम केलं आहे. तिने रंगभूमीवरील प्रायोगिक नाटकांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने लहानमोठ्या जाहिराती आणि मालिकांमध्ये देखील काम केलं. ‘फोर मोर शॉट्स प्लिज’, ‘बार्ड ऑफ ब्लड’, ‘क्रिमिनल जस्टीस’ या वेब सीरिजमुळे ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या