Home /News /entertainment /

बॉलिवूडला आणखी एक धक्का; हॉरर चित्रपटाचे निर्माते कुमार रामसे यांचे निधन

बॉलिवूडला आणखी एक धक्का; हॉरर चित्रपटाचे निर्माते कुमार रामसे यांचे निधन

कुमार रामसे हे भयपटांसाठी प्रसिद्ध होते. ते आणि त्यांचे भाऊ रामसे ब्रदर्स या बॅनरखाली हॉरर चित्रपटांची निर्मिती करायचे.

    मुंबई 8 जुलै: दिलीप कुमार यांच्या दु:खातून बाहेर पडण्याआधीच भारतीय प्रेक्षकांना आणखी धक्का बसला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते कुमार रामसे (Kumar Ramsay) याचं निधन झालं आहे. ते 85 वर्षांचे होते. 8 जुलै रोजी सकाळी 5.30च्या सुमारास त्यांना कार्डिअ‍ॅक अरेस्टच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. (Kumar Ramsay passed away) कुमार रामसे हे भयपटांसाठी प्रसिद्ध होते. ते आणि त्यांचे भाऊ रामसे ब्रदर्स या बॅनरखाली हॉरर चित्रपटांची निर्मिती करायचे. (Kumar Ramsay Movie) त्यांच्या निधनामुळे भारतीय सिनेसृष्टीतीला आणखी एक धक्का बसला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आजारपणामुळे नसिरुद्दीन शाह यांची झाली अशी अवस्था; इंटरनेटवर Photo Viral बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर रोमँटिक चित्रपट तयार केले जातात. परंतु कुमार रामसे हे पहिले निर्माते होते ज्यांनी भयपटांच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. त्यांनी पुराना मंदिर, साया, खोज, दरवाजा, और कौन, दहशत यांसारख्या अनेक सुपरहिट भयपटांची निर्मिती केली. त्यांनी हॉरर चित्रपट पाहणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. 70-80च्या दशकात त्यांच्या चित्रपटांची तुलना अनेकदा जगप्रसिद्ध हॉररपट निर्माते अल्फ्रेड हिचकॉक यांच्याशी केली जायची. मात्र गेल्या काही काळात ते वाढत्या वयामुळे फिल्मी दुनियेपासून दूर होते. कुमार रामसे यांच्या निधनामुळे भारतीय सिनेसृष्टीचं कधीही भरून काढता येणार नाही असं नुकसानं झालं आहे. अशा प्रतिक्रिया देत चाहत्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood, Entertainment, Horror

    पुढील बातम्या