JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पेहेरावाची आठवण करून द्यायची..', राष्ट्रपती निवडीच्या पार्श्वभूमीवर केदार शिंदेची मार्मिक पोस्ट

'प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पेहेरावाची आठवण करून द्यायची..', राष्ट्रपती निवडीच्या पार्श्वभूमीवर केदार शिंदेची मार्मिक पोस्ट

केदार शिंदे हे अशा कलाकारांपैकी एक आहेत जे कोणत्याही विषयावर स्पष्टपणे आपलं मत व्यक्त करतात. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत विविध विषयांवर लिखाण करत असतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जुलै-   केदार शिंदे हे अशा कलाकारांपैकी एक आहेत जे कोणत्याही विषयावर स्पष्टपणे आपलं मत व्यक्त करतात. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत विविध विषयांवर लिखाण करत असतात. आजही केदार शिंदे यांनी असंच काहीसं केलं आहे. देशातील राजकीय पार्श्वभूमीवर त्यांनी एक पोस्ट लिहली आहे. सध्या ही पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे. सध्या देशात राष्ट्रपती पदासाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांचं नाव पुढं आलं आहे. त्यांनतर सतत त्यांच्याबाबत चर्चा होताना दिसून येते. यादरम्यान अनेकवेळा त्यांच्या जातीचा-समाजाचा उल्लेख केला जातो. याच पार्श्वभूमीवर ही पोस्ट असल्याचं म्हटलं जात आहे. या गोष्टीची खंत केदार शिंदेंनी आपल्या नव्या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे. पाहूया त्यांनी नेमकं काय लिहलय. केदार शिंदे पोस्ट- ‘‘जर आपण त्यांना सर्वोच्च पदावर नेमायचं ठरवलं आहे, तर प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पेहेरावाची आठवण करून द्यायची गरज आहे का? आम्हा भारतीयांना त्यांचा अभिमान आहे पण, तुम्ही का त्याला तडा देताय? #president #presidentofindia #राष्ट्रवादी …’’ या पोस्टमधून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

**(हे वाचा:** TRP ALERT: मालिका संपत आली असाताना ‘मन उडू …’ ची टीआरपीच्या शर्यतीत उडी, समोर आला या आठवड्याचा रिपार्ट ) मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणून दिग्दर्शक केदार शिंदेंना ओळखलं जातं. केदार शिंदेनी अनेक उत्कृष्ट चित्रपट-नाटक मराठी मनोरंजनसृष्टीला दिले आहेत. त्यामध्ये सही रे सही, श्रीमंत दामोदरपंत, तू तू.. मी..मी.. गेला उडत, गोपाळा रे गोपाळा ही नाटकं. हसा चकटफू, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय, साहेब बिबी आणि मी या मालिका ऑन ड्युटी चोवीस तास, बकुळा नामदेव घोटाळे, अगं बाई अरेच्चा, यंदा कर्तव्य आहे अशा सिनेमांचा समावेश होतो. सोबतच ते सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या