मराठी मालिकांचा मोठा चाहतावर्ग आहे. मालिकांमध्ये दररोज येणारे ट्विस्ट आणि टर्न्स यामुळे प्रेक्षक मालिका पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. या आठवड्यात कोणत्या मालिकेने प्रेक्षकांचं सर्वात जास्त मनोरंजन करून पहिल्या स्थानावर बाजी मारली हे आपण जाणून घेऊया.
झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' ही मालिका सध्या दहाव्या स्थानावर आहे. मात्र ही लोकप्रिय मालिका सध्या आपल्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे.
'स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा' ही मालिका आठव्या स्थानावर आली आहे.मालिकेत सध्या पल्लवीने बाळाला जन्म दिला आहे.
झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका गेल्या काही आठवड्यांप्रमाणे आजही सातव्या क्रमांकावरच आहे.