JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कतरिना कैफ-विकी कौशलचं लग्नानंतर पहिलं व्हेकेशन,अभिनेत्याने शेअर केला PHOTO

कतरिना कैफ-विकी कौशलचं लग्नानंतर पहिलं व्हेकेशन,अभिनेत्याने शेअर केला PHOTO

Katrina-Vicky Vacation- लग्नानंतरसुद्धा हे दोघे सतत चर्चेत असतात. या रोमँटिक कपलबाबत जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. नुकतंच विकी कौशलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक निसर्गरम्य फोटो शेअर केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 मार्च-   बॉलिवूडमधील   (Bollywood)  सर्वात लोकप्रिय कपल म्हणून कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलला   (Vicky Kaushal)  ओळखलं जातं. या दोघांनी थेट लग्न करत सर्वांनाच चकित केलं होतं. त्यांच्या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. या दोघांनी डिसेंबरमध्ये शाही थाटामाटात लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतरसुद्धा हे दोघे सतत चर्चेत असतात. या रोमँटिक कपलबाबत जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. नुकतंच विकी कौशलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक निसर्गरम्य फोटो शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी विकी कौशल आणि कतरिना कैफ एयरपोर्टवर दिसून आले होते. दोघेही एकत्र एका सीक्रेट डेस्टिनेशनवर सुट्टी घालवण्यासाठी गेले आहेत. मंगळवारी संध्याकाळी विकी कौशलने ड्रीमी व्हेकेशनचा एक फोटोही शेअर केला.जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. विकीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अतिशय निसर्गरम्य परिसर दिसून येत आहे. या दोघांना एकत्र व्हेकेनेशनवर पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत.या दोघांनी व्हेकेशनचा स्वतःचा एकही फोटो शेअर केलेला नाही. लग्नानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ लगेचच आपल्या कामावर परतले होते. दोघांच्याही हातात अनेक उर्वरित प्रोजेक्ट्स होते. त्यामुळे ते शुटींगवर परतले होते. त्यांनतर ते आपापल्या कामात व्यग्र होते. परंतु प्रत्येक सणासुदीच्या निमित्ताने ते कामातून वेळ काढून सोबत सेलिब्रेट करताना दिसतात.

आता विकी कौशल आणि कतरिना कैफचे चाहते दोघांच्या सुंदर आणि रोमँटिक व्हेकेशन फोटोंची वाट पाहात आहेत. अलीकडेच, विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नानंतर पहिल्यांदाच एका पार्टीमध्ये एकत्र दिसून आले. त्यांचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते.हे दोघे अपूर्व मेहताच्या वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र दिसले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या