मुंबई, 16 जुलै- हृतिक रोशन,कतरिना कैफ,अभय देओल,फरहान अख्तर आणि कल्की कोचलीन स्टारर ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाने तरुणाईला अक्षरशः वेड लावलं होतं. या चित्रपटाची थीम आणि गाणी प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरले होते. फक्त देशातच नव्हे तर विदेशातसुद्धा या चित्रपटाला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटाच्या कलाकरांसाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी आज एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाचा समावेश आता स्पेनमधील कॉलेज अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. वास्तविक हा एक मार्केटिंग मॅनेजमेंट कोर्स आहे. या कोर्समध्ये आता हा चित्रपट अभ्यासावा लागणार आहे. काय आहे कारण? या चित्रपटाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. या चित्रपटाने स्पेनचं टुरिझम मोठ्या प्रमाणात वाढवलं होतं. या चित्रपटानंतर स्पेनच्या टुरिझममध्ये 32 टक्के वाढ झाली होती. कारण ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट स्पेनच्या विविध ठिकाणी शूट करण्यात आला होता. स्पेनच्या अनेक सुंदर ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग करण्यात करण्यात आलं होतं. या चित्रपटानंतर या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या 32 टक्क्यांनी वाढली होती.त्यांनतर आता हा एकदा तब्बल 65 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे हा चित्रपट आता मार्केटिंग मॅनेजमेंट कोर्सच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाला आहे.
हे वाचा: Koffee With Karan 7:महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवंडांसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या सारा-जान्हवी? नाव वाचून बसेल धक्का 2011 मध्ये ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. या चित्रपटाने ‘रोड ट्रिप’चा ट्रेंड सेट केला होता. या चित्रपटाने अनेकांना आयुष्याकडे नव्याने पाहण्याची संधी दिली होती. आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवं असं यातून सुचवण्यात आलं होतं. या चित्रपटातील गाणी आणि संवाद सुपरहिट झाले होते. चित्रपटातील संवाद अनेकवेळा ‘इन्स्पिरेशनल थॉट्स’ म्हणून सोशल मीडियावर पाहायला मिळतात. जावेद अख्तर यांनी लिहिलेली आणि चित्रपटात फरहान अख्तर याने म्हटलेली ती शायरी ‘दिलों मी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम’ आजही ऐकून लोकांना आयुष्य सकारत्मक वाटू लागतं.