JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO VIRAL- ढसाढसा रडला कार्तिक आर्यन, सारा राहिली बघत

VIDEO VIRAL- ढसाढसा रडला कार्तिक आर्यन, सारा राहिली बघत

kartik aaryan, sara ali khan हा व्हिडिओ लव आजकल २ च्या सेटवरच्या शेवटच्या दिवसाचा असल्याचं म्हटलं जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिमला, 03 जुलै- अभिनेता बॉलिवूड कार्तिक आर्यन आणि सारा अली खानच्या आगामी लव आज कल २ सिनेमाचं चित्रीकरण नुकतंच संपलं. ६६ दिवस चालणाऱ्या या सिनेमाचं चित्रीकरण अखेर संपल्यामुळे कार्तिक आणि सारा भावुक झाले होते. दोघांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर याबद्दल एक भावुक पोस्टही शेअर केली. या सगळ्यात आता लव आज कल २ च्या सेटवरच्या शेवटच्या दिवसाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ लव आजकल २ च्या सेटवरच्या शेवटच्या दिवसाचा असल्याचं म्हटलं जात आहे. यात कार्तिक सिनेमाचे दिग्दर्शक इम्तियाज अलीला मिठी मारून ढसाढसा रडताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून स्पष्ट दिसतं की, सिनेमाचं शुटिंग पूर्ण झाल्याचं दुःख कार्तिकला झालं आहे.

दिराच्या लग्नात रडली प्रियांका चोप्रा, हे आहे कारण सिनेमाचं चित्रीकरण संपल्याच्या निमित्ताने कार्तिकने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहिली. यात त्याने लिहिले की, ‘जेव्हा वीरा म्हणते की, ‘हा प्रवास खूप सुंदर आहे. मला वाटतं हा प्रवास कधी संपूच नये.’ मला इम्तियाज अलीसोबत चित्रीकरण करताना असाच अनुभव आला. माझ्यासाठी ६६ दिवसही कमी होते. चित्रीकरण पूर्ण झालं आहे. एक असा सिनेमा ज्याचं चित्रीकरण कधीच संपू नये असं वाटत होतं. माझ्या सर्वात आवडत्या दिग्दर्शकाचे आभार. या संपूर्ण प्रवासात सारा अली खानसारखी उत्तम साथ कोणी दिली नसती. मला तुझ्यासोबत अनेकदा काम करायला आवडेल.’

…म्हणून युवराज सिंगच्या पार्टीत अंगद बेदी- नेहा धुपिया दिसले नाहीत कार्तिक आर्यनच्याआधी सारानेही सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत पोस्ट लिहिली होती. ‘सिनेमाच्या शूटच्यावेळी मला दडपण जाणवू न देण्यासाठी धन्यवाद कार्तिक. कोणत्याही स्वार्थाशिवाय मला खूप काही दिल्याबद्दल आणि माझी काळजी घेण्यासाठी धन्यवाद. तुझ्यासोबत कॉफीपासून चहापर्यंत, मला अशा करते की, आपण हे सर्व पुन्हा करू शकू. मी तुला खूप मिस करेन. जेवढं तू विचारही करू शकत नाही.’

जाहिरात

World Cup- खास रोहित शर्माचं शतक पाहायला ही मराठमोळी अभिनेत्री गेली इंग्लंडला VIDEO: अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या