JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Kareena Kapoor: तिसऱ्या प्रेग्नन्सीबाबत व्यक्त झाली करीना कपूर, वहिनी आलिया भट्टबाबत म्हणाली...

Kareena Kapoor: तिसऱ्या प्रेग्नन्सीबाबत व्यक्त झाली करीना कपूर, वहिनी आलिया भट्टबाबत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर सध्या आपल्या ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात ती मि. परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत झळकणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 ऑगस्ट-   बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर सध्या आपल्या ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात ती मि. परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत झळकणार आहे. करीना या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत करीनाने आपल्या तिसऱ्या प्रेग्नन्सीबाबत आणि आलिया भट्टबाबतसुद्धा आपलं मत व्यक्त केलं आहे. पाहूया अभिनेत्रीने नेमकं काय म्हटलंय. ‘लाल सिंह चढ्ढा’च्या प्रमोशनदरम्यान करीनाने नुकतंच पिंकव्हीलाला एक मुलाखत दिली होती. यामध्ये अभिनेत्रीने अगदी मोकळेपणाने अनेक गोष्टींवर संवाद साधला. यावेळी बोलताना करीना म्हणाली, ‘ट्रोलर्सचा माझ्यावर अजिबात परिणाम होत नाही. कारण मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मी एक सकारात्मक व्यक्ती आहे. मी नेहमीच चांगल्या मूडमध्ये असते. मी माझे चाहते आणि पापाराझींसोबतसुद्धा अशाच चांगल्या मूडमध्ये असते. परंतु जे लोक मला ओळखत नाहीत. ते अशाप्रकारच्या कमेंट्स करत असतात’. असं म्हणत अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावलं आहे. इतकंच नव्हे तर मध्यंतरी सुरु असलेल्या आपल्या तिसऱ्या प्रेग्नेंसीबाबतही करीनाने संवाद साधला. काही दिवसांपूर्वी करीना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे,, अशा अफवा सोशल मीडियावर उठल्या होत्या. इतकंच नव्हे तर अभिनेत्रीचा एक फोटोसुद्धा एडिट करुन शेअर करण्यात आला होता. या संपूर्ण अफवांचं खण्डन करत करीनाने एक मजेशीर पोस्ट शेअर केली होती. याबाबत बोलताना करीना म्हणाली, ‘त्या गोष्टीचा मला त्रास झाला नाही, उलट मी त्या बातम्यांची मजा घेतली. मी तो व्हायरल फोटो पाहिला. आणि मला आश्चर्य वाटलं. कारण त्यामध्ये मी चक्क सहा महिन्यांची प्रेग्नेंट वाटत होते. पण तो फोटो एडिट केला होता. त्यामुळे मी तो शेअर ती मजेशीर पोस्ट लिहली होती. आणि जरी मी प्रेग्नेंट असते, तर काय पहिल्यांदा आहे? याआधी मी दोनवेळा होते. त्यामुळे मी त्या सर्व अफवांचा अगदी मनापासून आनंद घेतला. (हे वाचा: VIDEO: कोण आमिर खान? मी ओळखत नाही, कारण…; अन्नू कपूर यांच्या त्या विधानाने खळबळ **)** सोबतच आपली वाहिनी आणि अभिनेत्री आलिया भट्टबाबत बोलताना ती म्हणाली, ‘आलियाने इतक्या कमी वयात प्रेग्नेंसीचा निर्णय घेतला, हे खरंच कौतुकास्पद आहे. ती एक धाडशी व्यक्ती आहे. ती एक प्रतिभावान अभिनेत्रीसुद्धा आहे. यांनतरसुद्धा ती अशीच कामात व्यग्र राहणार आहे. कारण ती तितकी उत्कृष्ट अभिनेत्री आहे.या सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्हाला आधी स्वतःची खात्री हवी आणि तिला स्वतःची पूर्ण खात्री आहे’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या