मुंबई 5 जुलै**:** नकाब या चित्रपटातील ‘एक दीन तेरी बाहों मे’ या गाण्यातून नावारुपास आलेला जावेद अली (Javed Ali) आज भारतीय मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय गायकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. हिंदी, तमिळ, तेलुगु, मराठी अशा विविध भाषांमध्ये त्याने गाणी गायली आहे. (Javed Ali song) आज जावेदचा वाढदिवस आहे. (Javed Ali birthday) वाढदिवसाच्या निमित्तानं आज आम्ही तुम्हाला त्याच्या नावासंबंधीत एक भन्नाट किस्सा सांगणार आहोत. जावेदचं खरं नाव काही वेगळच आहे. त्यानं एका विशिष्ट कारणासाठी आपलं नाव बदललं होतं. तर मग पाहुया काय होतं ते कारण… लता दीदींची ती भेट वस्तू ठरली लकी; जावेद अली रातोरात झाला प्रसिद्ध जावेदचा जन्म 1982 साली दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्याचे वडील एक कव्वाली गायक होते. त्यामुळे वडिलांकडूनच त्याला संगीताचा वारसा मिळाला. त्याचं खरं नाव जावेद हुसेन असं आहे. पुर्वीच्या काळी अन्वर हुसेन नावाचे एक कव्वाली गायक होते. त्यांच्या नावावरुन वडिलांनी जावेदचं नाव जावेद हुसेन असं ठेवलं होतं. पुढे अद्यायावत संगीताचं तंत्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी जावेदनं गुलाम अली यांच्याकडे आला. त्यांच्यामुळे जावेदला संगीत म्हणजे काय खऱ्या अर्थानं कळू लागलं. बॅकग्राऊंड डान्सर कशी झाली बॉलिवूडची माँ? पाहा गीता कपूरचा प्रेरणादायी प्रवास त्यामुळे आपल्या गुरुला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यानं आपलं नाव जावेद अली लावण्यास सुरुवात केली. जावेद आज बॉलिवूड गाण्यांसोबतच जगभरात लाईव्ह स्टेज शो करतो. परंतु जेव्हा कधी त्याचं नाव घेतलं जातं तेव्हा त्याच्यासोबतच गुलाम अली यांचं देखील नाव घेतलं जातं. माझा गुरु सतत माझ्यासोबत आहे. ही भावना त्याला आत्मविश्वास देते. त्यामुळे त्यानं आपलं नाव बदललं.