JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'Luka Chuppi-2'च्या शूटिंगवेळी पुन्हा गोंधळ ; रुग्णांच्या नातेवाईकांसोबत बाऊन्सर्सनी केलं असं काही...

'Luka Chuppi-2'च्या शूटिंगवेळी पुन्हा गोंधळ ; रुग्णांच्या नातेवाईकांसोबत बाऊन्सर्सनी केलं असं काही...

Luka Chuppi-2 Shooting In Indore: या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी नवीन वाद निर्माण झाला आहे. ज्या रुग्णालयात शुटिंग सुरू आहे तेथील रुग्णांना भेटून देत नसल्याच आऱोप नातेवाईकांनी केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जानेवारी - मागच्या काही दिवसांपासून इंदूरमध्ये विकी कौशल आणि सारा आली खानच्या लुकाछुपी-2 ( Luka Chuppi 2) या सिनेमाचे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला (Luka Chuppi-2 Shooting In Indore)  सुरूवात झाल्यापासुन कोणत्या कोणत्या कारणामुळे चित्रपट चर्चेत येत आहे. वाद आणि चित्रपट असं समीकरण याच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी गुमाश्ता नगरच्या अरिहंत रुग्णालयात वाद झाला आहे. रुग्णांना भेटून देत नसल्याच आऱोप नातेवाईकांनी केला आहे. वाद वाढल्याने रुग्णालच्या व्यवस्थपान करणाऱ्यांना यामध्ये लक्ष घालावे लागले. गुमाश्ता नगरमध्ये लुकाछुपी-2 या सिनेमाच्या चित्रकरणासाठी सेट लावण्यात आला होता. चित्रीकरण अरिहंत रुग्णालयात होणार होते. दुसऱ्या मजल्यावर सारा आणि विकीसोबत चित्रपटाची सर्व टीम उपस्थित होती. सकाळच्या वेळी जेव्हा रुग्णांचे नातेवाईक चहा,नाष्टा देण्यासाठी पोहचले तेव्हा त्यांना थांबवण्यात आलं. बाऊन्सर्सनी नातेवाईकांना नाष्टा देण्यापासून थांबवले. यानंतरच हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. वाचा- ‘पर्सनल गोष्ट घराबाहेर नको’; ‘ये जवानी है…‘ची अभिनेत्री ‘त्या’ PHOTOवरून ट्रोल या रुग्णालयात दाखल अर्चना गुप्ता यांचे पती म्हणाले की, त्यांना सकाळी खाली जायचे होते, परंतु कोणीही त्यांना जाऊ दिले नाही. चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी कोणालाही येऊ दिले जात नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. जेव्हा या सगळ्या प्रकारणावरून गोंधळ निर्माण झाला तेव्हा कुठे चित्रपटाच्या निर्मात्यांनी माफी मागितल्याचे त्यांनी सांगितले.रुग्णालायच्या व्यवस्थापन करणाऱ्या अतित बगलानी यांनी मात्र असं काही झालं नसल्याचे सांगितलं आहे. कोणालाही भेटण्यापासून थांबवण्यात आलेले नाही. शिवाय शुटिंग सुरू असल्याने रुग्णालयाच्ये गेटवर सुरक्षा म्हणून बाऊन्सर्सना उभं केलं असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलं. वाचा- अरुंधतीचा बदला अंदाज! चेहऱ्यावरचं हास्य पाहून चाहत्यांना झाला आनंद मंगळवारी देखील ख्रिश्चन कॉलेजमध्ये शूटिंगदरम्यान असाच गोंधळ झाला. तेथे विद्यार्थ्यांनी परीक्षेत अडथळा येत असल्याचे सांगत गोंधळ घातला होता. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षाही अर्धा तास उशिरा सुरू झाली. आता डीएव्हीव्हीने याप्रकरणी कॉलेज व्यवस्थापनाला नोटीस दिली आहे. यापूर्वी देखील विकीच्या विरोधात एका व्यक्तीनं तक्रार दाखल केली होती. कोणतीही परवानगी न घेता विकी कौशल आणि त्याच्या टीमनं आपल्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर वापरल्याचं या व्यक्तीनं आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या