JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कौन बनेगा करोडपतीमध्ये भाग घ्यायचाय? या 3 गोष्टी असतील तरच व्हाल कोट्यधीश

कौन बनेगा करोडपतीमध्ये भाग घ्यायचाय? या 3 गोष्टी असतील तरच व्हाल कोट्यधीश

‘कौन बनेगा करोडपती 13’मध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांकडे या तीन गोष्टी असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही बिग बींसोबत हॉट सीटवर बसू शकणार नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 10 मे**:** अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) या शोच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना मालामाल करण्यास येत आहे. या लोकप्रिय शोचं 13 वं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा या शोमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ‘कौन बनेगा करोडपती 13’मध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांकडे या तीन गोष्टी असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही बिग बींसोबत हॉट सीटवर बसू शकणार नाही. सोनी वाहिनीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे. “प्रयत्न, मेहनत आणि अभ्यास या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तरच तुम्ही ‘हॉट सीट’ पर्यंत पोहचू शकता. अमिताभ बच्चन यांना भेटण्याचे भाग्य आणि कोट्यधीश होण्याची संधी तुम्हालाही मिळेल. ‘कौन बनेगा करोडपती 13’ नोंदणी करण्यासाठी सोनी टीव्हीवर रात्री 9 वाजता विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर द्या.” असा सल्ला देशभरातील स्पर्धकांना देण्यात आला आहे. ये फिटनेस कि बात है! सुंदर दिसण्यासाठी या अभिनेत्री दररोज करतात Yoga

संबंधित बातम्या

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळं शोच्या निवड पद्धतीमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना आता चार टप्पे पार करावे लागणार आहेत. यामध्ये नोंदणी, छाननी, ऑनलाईन ऑडिशन आणि मुलाखत असे चार टप्पे असतील. यापैकी प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पार करणाऱ्यांनाच हॉट सीटपर्यंत पोहोचता येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या