मुंबई 26 ऑगस्ट : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी (Hema Malini) गेली अनेक वर्षे आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मन जिंकत आहेत. अतिशय ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून त्याची ओळख होती. मात्र असाही काळ होता जेव्हा त्यांची इंडस्ट्रीत खिल्ली उडविली जायची. त्यांच्या लूक्सवर खराब कमेंट्स केल्या जायच्या. हेमा यांनी स्वतः हा अनुभव सांगितला होता. हेमा मालिनी या बऱ्याचदा कांजीवरम साडीत दिसतात, जी त्यांच्यावर अगदी खुलून दिसते. 2015 साली त्यांनी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितल होतं की, त्यांच्या या लुकची खिल्ली उडविली जायची. पण त्यांच्या आईने त्यांना कांजीवरम साडी नेसण्याची सवय लावली होती. त्यांनी विरोध केला तरी आई त्यांना साडीच नेसवायची.
पुढे त्यांनी सांगितल, “चित्रपट निर्मात्यांच्या पत्नी, ज्या विशेषतः पंजाबी असायच्या त्या माझ्या साडी आणि ब्लाऊजची खिल्ली उडवायच्या. ‘ती बघा मद्रासी आली.’ असं म्हणायच्या.” पुढे आई विषयी सांगताना त्या म्हणाल्या, “मला घडविण्यात माझ्या आईचा हात आहे. मी आज जी काही आहे ती आईमुळे आहे.”
नुसरत जहाँच्या घरी येणार नवा पाहुणा; मुलाच्या जन्मावेळी ही खास व्यक्ती असणार सोबतआई विषयी आणखी ही त्यांनी म्हटलं आहे की, “मला शास्त्रीय नृत्य शिवण्यासाठी तिनेच मला प्रेरित केल. जर मी नृत्यांगना नसते तर हे सगळं मला कधीच मिळालं नसतं.” ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी राज कपूर यांच्या ‘सौदागर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. कांजीवरम साडी आणि केसात गच्च फुलांनी भरलेला गजरा असा लूक करून त्या चित्रपटांच्या प्रीमियरला जायच्या. धर्मेंद्र यांनी देखील अशाच लुक मध्ये हेमा यांना पहिल्यांदा पाहिलं होतं. तेव्हाच त्यांना त्या आवडल्या होत्या. आपल्या आत्मचरित्रात (Hema Malini Autobiography) हेमा यांनी याचा उल्लेख केला आहे.