मुंबई 25 ऑगस्ट : बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) मागील काही महिन्यांत फारच चर्चेत होती. तिच्या प्रेगनन्सीची विशेष चर्चा रंगली होती. तर आता तिच्या घरी लहाण पाहुण्याचं आगमन होणार आहे. काही महिन्यांपूर्वी नुसरत आई होणार असल्याचं समजलं होतं. त्यानंतर तिचा पूर्व पती निखिल जैन (Nikhil Jain) आणि नुसरत यांचा वाद मीडियात आला होता. दरम्यान आनंदबाझार पत्रिकेने दिलेल्या वृत्तानुसार नुसरत डिलिव्हरीसाठी एका खाजगी रुग्णालयात भरती झाली आहे. वृत्तांनुसार 26 ऑगस्टला तिच्या मुलाचा जन्म होऊ शकतो. नुसरत यश दासगुप्ता (Yash Dasgupta) याच्याशी रिलेशनशिपमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार नुसरतने डॉक्टर्सना खास विनंती केली आहे की, डिलिव्हरीवेळी यश तिच्यासोबत असावा. त्यामुळे मुलाचा जन्म होताना यश नुसरतसोबत असण्याची शक्यता आहे.
नुसरतचं लग्न 2019 मध्ये निखिल जैन याच्याशी झालं होतं. तुर्कीमध्ये दोघांनी धुमधडाक्यात लग्न केलं होतं. काही मोजक्या व्यक्तिच या लग्नाला उपस्थित होत्या. त्यानंतर भारतात त्यांनी जंगी सेलिब्रेशन करत रिसेप्शन दिलं होतं. त्याला बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या. मात्र वर्षभरातच दोघांमध्ये विवाद सुरू झाले. विवादानंतर नुसरतने हे लग्नच अमान्य केलं होतं. व आम्ही पती पत्नी नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांचा हा वाद देशभरात रंगला होता.
याच दरम्यान नुसरतच्या प्रेगनन्सीच्या बातम्या आल्या होत्या. तेव्हा ती यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं समजलं होतं. त्यानंतर नुसरतवर टीकाही झाली होती. पण ट्रोलिंकडे तिने कधीही लक्ष दिलं नाही. तर आता ती आई होणार आहे.