मुंबई 29 जुलै : अभिनेता संजय दत्तचं (Sanjay Dutt) प्रोफेशनल लाइफ जितकं चर्चेत राहीलं त्याही पेक्षा अधिक त्याचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत राहिलं होतं. तब्बल तीन वेळा बॉलिवूडच्या संजूबाबाने संसार थाटले होते. मान्यता दत्तशी त्याने तिसऱ्यांदा लग्न केलं होतं. तर तितकचं ते चर्चेचा विषयही ठरलं होतं. 29 जुलै 1959 ला संजय दत्तचा जन्म झाला होता. जाणून घ्या त्याच्या वैवाहिक आयुष्याविषयी. मान्यता (Manyata Dutt) म्हणजेच दिलनवाज शेख पण तिचं स्क्रिन नेम मान्यता होतं. 2008 साली तिने कमाल राशिद खान म्हणजेच केआरकेच्या ‘देशद्रोही’ चित्रपटातून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. दुबईत बालपण गेलेल्या मान्यताने चित्रपटसृष्टीत नाव कमावयला सुरुवात केली होती. तेव्हाचं तिची ओळख संजय दत्तशी झाली होती.
दरम्यान याआधी संजयचे दोन विवाह झाले होते. 1987 साली त्याने अभिनेत्री रिचा शर्मा हिच्याशी विवाह केला होता. पण रिचाला ब्रेन ट्युमर होता. 1996 साली तिचा या दिर्घ आजाराने मृत्यु झाला. त्यांना त्रिशला दत्त (Trishala Dutt) ही मुलगी देखील आहे. ती अमेरिकेत तिच्या आजी आजोबांसोबत (आईचे आईबाबा) राहते. तर त्यानंतर त्याने एअरहोस्टेस आणि मॉडेल रिया पिल्लईसोबत 1998 साली विवाह केला. पण हा ही संसार फार काळ टिकू शकला नाही. काही वर्षातचं त्यांनी घटस्फोट घेतला होता.
सलमान खानच नाही तर ‘या’ सेलेब्सनी केलंय Bigg Boss होस्ट; नव्या पर्वासाठी करण जोहर सज्ज 2008 साली संजय दत्तने नोंदनी पद्धतीने मान्यताशी गोव्यात विवाह केला. तर त्यानंतर हिंदू पद्धतीने लग्नही केलं. त्याआधी 2 वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी मान्यता 29 वर्षांची होती. तर संजय दत्त 50 वर्षांचा होता. त्यांच्यातील वयाचा फरक नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्यात तब्बल 21 वर्षांचं अंतर आहे.
2010 साली मान्यता आणि संजय यांना दोन जुळी मुलं झालं. शरान आणि इकरा अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. दत्त कुटुंबासोबतच मान्यता त्यांचं प्रोडक्शन हाऊसही सांभाळते. संजयच्या प्रत्येक वाईट काळतही मान्यता त्याच्यासोबत खंबीरपणे उभी होती.