JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Happy Birthday Rinku Rajguru: 'ती' सध्या काय करते? अकलूजच्या आर्चीचं करिअर 'सैराट'

Happy Birthday Rinku Rajguru: 'ती' सध्या काय करते? अकलूजच्या आर्चीचं करिअर 'सैराट'

सैराट फेम रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) आर्ची या पात्रामुळे एक वेगळी ओळख निर्माण केली. आज एवढी वर्ष होऊनही सैराटशी तिचं नातं नेमकं कसं आहे जाणून घेऊया.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 3 जून: सैराट (Sairat marathi movie) या चित्रपटाने मराठीची सगळी गणितंच बदलली. मराठी चित्रपट वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायचं काम या चित्रपटाने केलं. सैराटमधून मराठी चित्रपटसृष्टीला मिळालेला एक चेहरा होता रिंकू राजगुरु. (Rinku Rajguru)रिंकूला सैराटने जी ओळख दिली ती खचितच इथून पुढे कोणताही चित्रपट देईल. एवढी वर्ष होऊन गेली तरी सैराटची जादू आजही तितकीच आहे. सैराटशी रिंकूचं नेमकं नातं कसं आहे हे तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. तिचं आर्ची हे पात्र, तिचे डायलॉग आजही लोकांना लक्षात आहेत. ‘मराठीत सांगितलेलं कळत नाही? Englisһ मध्ये सांगू?’ या एका डायलॉगने तर सगळ्यांना वेड लावलं होतं. तिला हा चित्रपट करताना काय वाटलं होतं आणि त्याच्या यशाबद्दल नक्की काय वाटतं याबद्दल बॉलिवूड हंगामाच्या एका मुलाखतीत तिला प्रश्न विचारला होता. त्यावर तिने सांगितलं होतं, “सैराटमुळे माझं अख्खं आयुष्यचं बदलून गेलं. माझ्यासाठी सैराटला मिळालेला प्रतिसाद आणि त्यानंतरच सगळं फार नवीन होतं. मी कधी विचार केला नव्हता की मी अभिनय करेन, चित्रपटसृष्टीत येईन. पहिलीच फिल्म म्हणून मी असंच मजेमजेत काम करून टाकलं. पण एका रात्रीत माझं आयुष्य बदलेल असं मला वाटलंच नव्हतं. आर्चीला लोक ओळखतात एवढं प्रेम करतात याबद्दल छान वाटतं. याआधी लोक ओळखत नव्हते आणि अचानक सगळ्यांच्या आयुष्याचा मी एक भाग झाले, असं मी कधी अनुभवलं नव्हतं.” सैराटच्या हिंदी रिमेकला यश का नाही मिळालं याबद्दल ती सांगते, “तेलगूचे मराठीमध्ये रिमेक होतात, हिंदीचे ही होतात. पण एखाद्या मराठी चित्रपटाला एवढा तुफान प्रतिसाद मिळणं आमच्यासाठी नवीन होतं. मराठी चित्रपटासाठी ही मोठी गोष्ट आहे. शेवटी प्रत्येकजण आपापल्या दृष्टीने चित्रपट बनवतो. त्याला कसा प्रतिसाद द्यायचा हे शेवटी प्रेक्षकांच्या हातात आहे.”

रिंकू सध्या ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटातून येत्या महिन्यात भेटीला येणार आहे. याशिवाय तिचा कोणता बॉलिवूड प्रोजेक्ट येईल याकडे फॅन्सचं लक्ष लागलं आहे. हे ही वाचा- असंभव ! 12 वर्षांनी एकत्र आलेल्या या चेहऱ्यांची एकेकाळी टीव्हीवर होती दहशत रिंकू एक कुशल अभिनेत्री म्हणून नाव कमवत आहे. अवघ्या 13-14 वर्षांच्या वयात तिने सैराटसारखा चित्रपट केला तरी डोक्यात हवा जाऊ न देता आजही ती नव्या गोष्टी शिकण्याकडे आग्रही असते. तिने तिच्या अभिनयावर काम केलं तशी ती वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येत असते. तिने कागर, मेकअप चित्रपटात केलेल्या भूमिका गाजल्या. नुकतीच तिने झुंड चित्रपटात केलेली भूमिका सुद्धा खूप वेगळी होती आणि ती प्रेक्षकांना पसंत पडली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या