Home /News /entertainment /

असंभव ! 12 वर्षांनी एकत्र आलेले हे चेहरे; एकेकाळी छोट्या पडद्यावर यांचीच होती दहशत, आठवतय का?

असंभव ! 12 वर्षांनी एकत्र आलेले हे चेहरे; एकेकाळी छोट्या पडद्यावर यांचीच होती दहशत, आठवतय का?

झी मराठीवरील हॉरर असंभव ( Asambhav) मालिका आठवतेय का, या मालिकेचा आजही चाहता वर्ग टिकून आहे. आज बारा वर्षानंतर या मालिकेतील कलाकारांचे रियुनियन झालं आहे.

  मुंबई, 2 जून - झी मराठीवरील हॉरर असंभव ( Asambhav) मालिका आठवतेय का, या मालिकेचा आजही चाहता वर्ग टिकून आहे. आज बारा वर्षानंतर या मालिकेतील कलाकारांचे रियुनियन झालं आहे. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेत्री उर्मिला कोठारे हिनं नुकतीच एक पोस्ट केली आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. कारणही तसचं आहे. उर्मिलानं एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये झी मराठीची लोकप्रिय मालिका असंभव मधील कलाकार दिसत आहेत. 12 वर्षांनी या मालिकेतील कलाकारांचे रियुनियन झालं आहे. उर्मिलानं खास पोस्ट लिहित याबद्दल माहिती दिली आहे. उर्मिलानं म्हटलं आहे की, आम्ही आठवलो का...??? असंभव रियुनियन तेही बारा वर्षांनी... हे सगळं घडवून आणल्याबद्दल @sharvaripatankar.... धन्यावाद आआआह्ह्ह खूप दिवसांनी खूप हसलो.... जुने दिवस आठवले आणि शूटिंगच्या दिवसातील काही गंमती आठवल्या. मला खूप आवडलं हे.. असं पुन्हा केलं पाहिजे...अशी काही पोस्ट उर्मिलांना म्हटलं आहे. चाहत्यांनी देखील असंभव मालिकेला मिस करत असल्याचे म्हटलं आहे. वाचा-'तिमिरातील तिरीपेचा शोध मी घेईन...' प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट नेमकी कशाबद्दल? उर्मिलाच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी मालिकेचा दुसरा भाग लवकरच काढावा अशी विनंती केली आहे. एका चाहत्यांने म्हटलं देखील आहे की,उर्मिला तुमच्या सगळ्यांचाच अभिनय खूप छान झाला होता. तू तर खूप गोड दिसली आहेस त्यात. खरं तर तुम्ही त्याचा पुढचा सिझन घेऊन यायला हवा कारण शेवटी त्याच्या शेवटी इंदुमती त्या मूर्तीत कायमची राहते आणि सुहास भालेकर तसं म्हणतात सुद्धा. प्लिज टीम ने विचार करावा..अशा अनेक कमेंट आल्या आहेत. प्रत्येकानं दुसरा भाग कधी येणार याबद्दल विचारलं आहे.
  असंभव ही झी मराठी वाहिनीवरून प्रसारित झालेली मराठी मालिका आहे. सतीश राजवाडे यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते. चिन्मय मांडलेकर याने या मालिकेचे लेखन केले होते. मानसी साळवी, ऊर्मिला कानेटकर, उमेश कामत, नीलम शिर्के, सुनील बर्वे, आनंद अभ्यंकर, सुहास भालेकर, अशोक शिंदे, मधुराणी प्रभुलकर, इत्यादी कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका होत्या
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या