JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / विनोदवीराची प्रेमकथा डोळ्यात पाणी आणेल; कुशल बद्रिकेला प्रेयसी द्यायची 50 रुपये

विनोदवीराची प्रेमकथा डोळ्यात पाणी आणेल; कुशल बद्रिकेला प्रेयसी द्यायची 50 रुपये

गेली काही वर्षे सातत्याने कुशल ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमात प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आज कुशलचा वाढदिवस, जाणून घ्या कुशलच्या या हास्यमय प्रवासाविषयी.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 20 जुलै: महाराष्ट्रातील सध्याच्या काही विनोदी अभिनेत्यांची नावं घ्यायची म्हटलं तर कुशल बद्रिके (Kushal Badrike) हे नाव आवर्जून घ्यावं लागेल. गेली काही वर्षे सातत्याने कुशल ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमात प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आज कुशलचा वाढदिवस, जाणून घ्या कुशलच्या या हास्यमय प्रवासाविषयी. कुशलचा जन्म 20 जुलैला कोल्हापुरात अगदी सर्वसामान्य कुटुंबात झाला होता. पण कलेला तोड नसते हेच खरं. अभिनयाच्या कलेने त्याला कधीच स्वस्थ बसू दिलं नाही. कॉलेज जीनवापासूनच त्याने अनेक नाटकांचे प्रयोग करायला सुरुवात केली होती. पण त्यातून म्हणावी अशी मिळकत ही सुरूवातीच्या काळात मिळत नाही. अनेक मराठी कलाकार हे तळागाळातून आलेले आहेत. त्यातीलच एक म्हणजे अभिनेता कुशल बद्रिके.

कुशलने ज्याप्रकारे कठीण काळातून त्याचं करिअर केलं तशीच त्याची लव्हस्टोरीही हटके होती. त्याला त्याच्य करिअरसाठी प्रोत्साहन देणारी तसेच त्याच्या मागे उभी राहणारी त्याची प्रेयसी होती. कुशलचा कठीण काळ तिने पाहिला होता. त्याच्या प्रत्येक सुख- दुःखात तिने साथ दिली होती. याच विषयी कुशने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

‘Raj Kundra’s Dirty picture’ अश्लिल चित्रफितीच नाही, IPL फिक्सिंग-अंडरवर्ल्डशी डील यातही फसला होता शिल्पा शेट्टीचा नवरा

संबंधित बातम्या

कुशलच्या आयुष्यात एक प्रसंग घडला होता ज्यामुळे आधीच घरची परिस्थिती नाजूक असताना त्यात तेरावा महिना अशी गत झाली होती.    कुशलचे वडील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, कुशलची आर्थिक परिस्थिती आधिच बेताची होती. कुशलचे नाटकाचे प्रयोग लागले की त्याला धडधड व्हायची कारण नाटकाचे भत्ते वेळेवर मिळायचे नाही. त्यातही प्रयोग लागले तर मग खायचं काय?

कुशल म्हणाला, “माझ्याकडे पैसे नसायचे, पण कुणीतरी मुलगी माझ्या बॅगेत ५० ते ६० रुपये गुपचूप टाकायची. यामुळे माझं पोटंही भरायचं, वडापाव, बसभाडं सर्वकाही व्हायचं. जी मुलगी बॅगेत पैसे टाकायची ती माझीचं प्रेयसी होती. ती समोर बसली आहे आणि तिला मला थँक्स म्हणायचंय.”

जाहिरात

कुशलने त्याची प्रेयसी सुनैनाशीच (Sunaina Badrike) विवाह केला होता. जी आती त्याची पत्नी आहे. ती एक कथ्थक डान्सर आहे. 2009 साली त्यांनी विवाह केला होता. त्यांना एक लहान मुलगा देखील आहे. ‘चला हवा येऊ द्या’ शिवाय अनेक चित्रपटांतही त्याने विनोदी भूमिका साकारल्या आहेत. ज्यात जत्रा, भाऊचा धक्का, हुप्पा हुय्या यांत तो दिसला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या