मुंबई 7 जुलै : सुफी संगीतातील एक लोकप्रिय नाव म्हणून प्रसिद्ध गायक कैलाश खेर (Kailash Kher) हे ओळखले जातात. बॉलिवूडमध्ये त्यांनी मोठं नाव कमावलं आहे. पण यासाठी कैलाश यांनी मोठा संघर्ष केला होता. तर संगीत गुरू शोधण्यासाठी त्यांनी घरही सोडलं होतं. कैलाश यांचा जन्म 7 जुलै 1973 ला उत्तर प्रदेशातील मेरठ (Meruth) येथे झाला होता. त्यांचे वडील मेहर सिंग खेर हे देखील एक पारंपारिक संगीत गायक होते. त्यामुळे संगीताचं बाळकडू कैलाश यांना घरातूनच मिळालं होतं.
वाढदिवशी रणवीर सिंगची चाहत्यांना गोड भेट; नव्या भूमिकेसाठी सज्जवयाच्या अवघ्या चौथ्या वर्षीच त्यांची संगीत कला दिसू लागली होती. घरात काही वाद्य ते वाजवायचे. त्यानंतर वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी चांगला संगीत गुरू शोधायला सुरुवात केली. त्यासाठी घरही सोडलं. लहान वयातच संगीतासाठी त्यांनी घर सोडलं होतं.
संगीत शिकण्यासाठी त्यांना काही आर्थिक अडचणींचा ही सामना करावा लागला होता. त्यासाठी ते 150 रुपयांसाठी म्यूझिक क्लास घ्यायचे. त्यातून ते स्वतःचा खर्च भागवत असे. अनेक संघर्ष करत कैलाश यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2001 साली मुंबई गाठली. त्यांचे काही मित्र आधीच मुंबईत स्थित होते. पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना कमी दर्ज्याच्या हॉटेल्स वर राहावं लागत होत.
2003 साली त्यांना ‘आल्लाह के बंदे हस्ते’ (Allah Ke Bande Haste) हे गाणं गाण्याची संधी मिळाली. ‘वैसा भी होता है’ या चित्रपटातील हे गाणं होतं. यानंतर या गाण्याने इतिहासच रचला. व गाणं सुपरहिट झालं. यानंतर कैलाश यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही ‘तेरी दिवानी’, ‘संया’, ‘तौबा तौबा’, ‘चांद सिफारिश’ अशी सुपर हीट गाणी त्यांनी दिली. जवळपास 500 हून अधिक गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांना 2017 साली पद्मश्री हा पुरस्कार देखील मिळाला आहे.