JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / BB OTT: नेहा भसीनने रिद्धिमा पंडितला केलं KISS; आणि त्यानंतर जे घडलं...

BB OTT: नेहा भसीनने रिद्धिमा पंडितला केलं KISS; आणि त्यानंतर जे घडलं...

‘बिग बॉस OTT’ ची स्पर्धक आणि गायिका नेहा भसीनने (Neha Bhasin) दुसरी स्पर्धक आणि अभिनेत्री रिद्धिमा पंडितला(Riddhima Pandit) चक्क लीप किस केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 ऑगस्ट- टीव्हीवरील प्रचंड लोकप्रिय असलेला रिएलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’ होय. बिग बॉस नेहमीचं स्पर्धकांच्या विचित्र वागणुकीमुळे आणि वादविवादांमुळे चर्चेत असतो. नुकताच बिग बॉसचा 15वा सिझन एका नव्या रुपात आपल्या भेटीला आला आहे. यावेळी ‘बिग बॉस OTT**’(Bigg Boss** OTT) च्या रुपात पाहायला मिळत आहे. 6 आठवड्यानंतर हा शो टीव्हीवर शिफ्ट केला जाणार आहे. सध्या करण जोहर होस्ट करत असलेला हा शो चांगलाच चर्चेत आला आहे. शो सुरु होऊन अजून एक आठवडाही झालेला नाहीय. तोपर्यंत अनेक इंटरेस्टिंग गोष्टी बिग बॉसच्या घरात घडू लागल्या आहेत. त्यातीलचं एक म्हणजे एका लेडी स्पर्धकाने दुसऱ्या लेडी स्पर्धकाला चक्क किस केलं आहे.

संबंधित बातम्या

‘बिग बॉस OTT’ ची स्पर्धक आणि गायिका नेहा भसीनने (Neha Bhasin) दुसरी स्पर्धक आणि अभिनेत्री रिद्धिमा पंडितला**(Riddhima Pandit)** चक्क लीप किस केलं आहे. यामुळे चर्चेला उधान आलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओपाहून चाहते अंदाजा लावत आहेत, की हा सिझन खूपच बोल्ड होणार आहे. (हे वाचा: HBD: जॉनी यांच्या नावापुढे लीवर कसं लागलं; जाणून घ्या तो किस्सा   ) खरं तर शोमध्ये लेडी बॉस शोधण्याची लगबग सुरु आहे. यादरम्यान स्पर्धकांना एक टास्क देण्यात आला होता. यानुसार एका स्पर्धकाने अगदी शांत एखाद्या पुतळ्यासारखं उभं राहायचं, तर प्रतीस्पर्धकाने त्याला हालचाल करण्यास भाग पाडायचं असा हा टास्क होता. यामध्ये रिद्धिमा स्टॅच्यू बनून उभी होती. तर नेहा भसीन तिला हलवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र कोणतीच पद्धत तिला हालवण्यामध्ये यशस्वी झाली नाही. त्यामुळे नेहाने हा अतरंगी पर्याय निवडला आणि तिने सर्वांसमोर रिद्धिमाला लीप किस केलं. (हे वाचा: ठरलं! सोनमची बहीण करणार लग्न; पाहा कोण आहे अनिल कपूरचा दुसरा जावई   ) सध्या रिद्धिमा आणि नेहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. वूटने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर हा प्रोमो शेयर केला आहे. तसेच लवकरच हा एपिसोड आपल्याला वूटवर पाहायला मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या