JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / देव माणूसमध्ये येणार मोठा ट्विस्ट; डॉक्टरला पकडण्यासाठी ACP नं आखला नवा प्लान

देव माणूसमध्ये येणार मोठा ट्विस्ट; डॉक्टरला पकडण्यासाठी ACP नं आखला नवा प्लान

एसीपी विद्या आता त्या गावात आली आहे. परंतु ती त्याला पकडण्यात यशस्वी होईल का? हाच प्रश्न गेल्या कित्येत दिवसांपासून प्रेक्षकांना पडला आहे. (Devmanus new twist)

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 3 मे**:** देव माणूस (Devmanus) ही छोट्या पडद्यावरील सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. देवी सिंग (devi singh) नावाचा एक आरोपी आपली विकृत कृत्य साध्य करण्यासाठी महिलांच्या हत्या करतो. यावर ही मालिका आधारित आहे. तो सध्या एका गावात डॉक्टरचा वेश परिधान करुन लोकांना फसवत आहे. अन् या सिंगला पकडण्यासाठी एसीपी विद्या आता त्या गावात आली आहे. परंतु ती त्याला पकडण्यात यशस्वी होईल का? हाच प्रश्न गेल्या कित्येत दिवसांपासून प्रेक्षकांना पडला आहे. (Devmanus new twist) आरोपीला पकडण्यासाठी एसीपीनं विविध प्रकारचे प्रयत्न केले. परंतु ती त्याला पकडण्यात अपयशी ठरली. इतकंच काय तर तिनं केस सोडून द्यावी यासाठी त्यानं तिच्या मुलीचं देखील अपहरण केलं होतं. परंतु तरीही एसीपीनं मात्र हार मानलेली नाही. तिनं त्याला पकडण्यासाठी आता एक वेगळाच सापळा रचला आहे. काही वर्षांपूर्वी देवी सिंग एका महिलेला घेऊन हॉटेलमध्ये गेला होता. त्या हॉटेलच्या मालकानं त्याला पाहिलं होतं. अन् त्याच्याच मदतीनं आता ती त्याला पकडण्याचा प्लान आखत आहे. एसीपीनं हॉटेल मालकावर नजर ठेवण्यासाठी काही पोलीस तैनात केले आहेत. देवी सिंग त्या मालकाला मारण्याचा प्रयत्न करेल त्यावेळी पकडता येईल असा अंदाज एसीपीनं लावला आहे. अर्थात यामध्ये ती यशस्वी हील का? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. ब्लॅक साडीमधल्या ग्लॅमरस PHOTO नी नेटकऱ्यांना केलं घायाळ; कधी काळी जसप्रीत बुमराह बरोबर चर्चेत होतं नाव!

संबंधित बातम्या

‘देवमाणूस’ ही मालिका साताऱ्यात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. या ठिकाणी अगदी मालिकेत दाखवल्याप्रमाणेच एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीनं डॉक्टराचं सोंग पांघरुन 13 वर्षात तब्बल सात स्त्रियांना फसवलं. या गुन्हेगाराला देखील पोलिसांनी अशाच प्रकारे पकडलं होतं. या पार्श्वभूमीवर ‘देवमाणूस’ मालिकेचा शेवटही असाच होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या