JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Deepika Padukone : दीपिका पादुकोणची तब्येत ढासळली; 12 तास रुग्णालयात, याआधीही झाला होता असाच त्रास

Deepika Padukone : दीपिका पादुकोणची तब्येत ढासळली; 12 तास रुग्णालयात, याआधीही झाला होता असाच त्रास

कामात बिझी असताना दुसऱ्यांदा अभिनेत्री दीपिका पादुकोणची तब्येत बिघडली आहे. तिला याआधीही असाच त्रास झाला होता.

जाहिरात

दीपिका पादुकोण रुग्णलयात दाखल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 सप्टेंबर : बॉलिवूडमधील सध्याची सर्वात आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण बाबत मोठी माहिती समोर आली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिची तब्येत बिघडल्यानं तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  दीपिकाला काल म्हणजे 26 सप्टेंबरला रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दीपिकाला अचानक अस्वस्थ लाटू लागल्यानं तिला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं.  दीपिकाला सध्या बरं वाटत असल्यानं तिली डिस्चार्ज दिल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण ला अस्वस्थतेमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका जवळपास 12 तास ब्रीच कँडी रुग्णालयात होती. या वेळात तिच्या अनेक टेस्ट करण्यात आल्या.  दीपिकाकडून अद्याप याविषयी कोणतीही माहिती मिळाली नसली तरी पिंकविलानं दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाची तब्येत आता स्थिर असून तिला डिस्चार्ज देण्यात आलाय.  तब्येतीत सुधारणा होत आहे.  अभिनेत्रीच्या तब्येतीची माहिती समोर येताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. हेही वाचा - Filmfire मिळताच रणवीर झाला रोमँटिक; बायकोला सगळ्यांसमोर केलं किस, Video व्हायरल दीपिकाला अस्वस्थतता जाणवल्यानं रुग्णालयात दाखल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांआधी अभिनेता प्रभासबरोबर हैद्राबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाचं शुटींग करताना दीपिकाचा हार्ट रेट अचानक वाढल्यानं तिला रुग्णलयात दाखल करण्यात आलं होतं.  तेव्हा जवळपास 5-6 तास दीपिका रुग्णालयात होती.  मात्र ती रुटीन चेक अपसाठी गेल्याचं सिनेमाच्या निर्मात्यांनी सांगितलं होतं. दीपिकावर कामाचं प्रेशर आहेच मात्र त्याचप्रमाणे मधल्या काळात अभिनेता आणि नवरा रणवीर सिंह न्यूड फोटोशूट प्रकरणातही दीपिका-रणवीरला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. त्यामुळेही त्यांना मानसिक त्रास झाला असावा असं चाहत्यांकडून म्हटलं जात आहे.

दीपिकाकडे सध्या अनेक प्रोजेक्ट आहेत. ती कामात सतत बिझी आहे.  दीपिका सध्या अमिताभ बच्चन यांच्या ‘द इंटर्न’ सिनेमासाठी काम करतेय. त्याचप्रमाणे तिचे ‘पठाण’, ‘फाइटर’, ‘प्रोजेक्ट’ के हे सिनेमे देखील बॅक टू बॅक  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या