मुंबई, 23 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री उर्वशी रौतेलाही कोणत्या न कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अशातच या दोन्ही अभिनेत्रींची फ्लाइटमध्ये भेट घडली. मग काय सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली. यासोबतच दोघींचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. दीपिका पादुकोण आणि उर्वशी रौतेला दुबईहून मुंबईला परतत असताना दोघींची फ्लाइटमध्ये भेट झाली. यावेळी उर्वशीने आनंदाच्या भरात दीपिकाला गालावर कीस केले. या दोघींच्या भेटीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर गराळा घालत आहे. दीपिकाच्या फॅन क्लबने तिचा आणि उर्वशीचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. दोघींमधील बॉन्डिंग पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
दीपिका आणि उर्वशीच्या फ्लाइटमधील हे छायाचित्र समोर येताच चाहत्यांचे चेहरे आनंदाने फुलले. अशा प्रकारचे बॉन्डिंग बहुतेक हिरोइन्समध्ये दिसत नाही. अशा स्थितीत दीपिकाला अशा प्रकारे पाहून उर्वशी खूश होणे ही नक्कीच नवीन मैत्रीची सुरुवात असल्याचं बोललं जात आहे. फ्लाइटमधून उतरल्यानंतर दीपिका एअरपोर्टच्या बाहेर काळ्या ड्रेससह डेनिम जॅकेटमध्ये दिसली. दीपिकाचा तो व्हिडीओदेखील सगळ्यांचं लक्ष वेधत आहे.
दरम्यान, दीपिका पादुकोणने नुकतंच इन्स्टाग्रावर फोटो शेअर करत आगामी चित्रपट ‘पठाण’ विषयी अपडेट दिली. फोटो शेअर करताना तिने या चित्रपटाचे डबिंग सुरू असल्याची माहिती दिली. हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त दीपिकाकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. ती प्रभाससोबत ‘प्रोजेक्ट के’मध्ये काम करत आहे.