JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Ranveer Singh च्या इन्स्टाग्राम सेशनमध्ये Deepikaचा सवाल, अभिनेता बोलतो... ''तू फक्त जेवण गरम कर बेबी''

Ranveer Singh च्या इन्स्टाग्राम सेशनमध्ये Deepikaचा सवाल, अभिनेता बोलतो... ''तू फक्त जेवण गरम कर बेबी''

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याची सर्वात कूल आणि बिनधास्त स्टार अशी ओळख आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याची सर्वात कूल आणि बिनधास्त स्टार अशी ओळख आहे. रणवीर आपला ड्रेसिंग सेंन्स किंवा पब्लिक प्रेजेंसनं आपल्या फॅन्सला चांगलीच भुरळ पाडतो. रणवीरचे नेहमी वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात. त्याचे फॅन्स त्याला आणि दीपिका पदुकोणला (Deepika Padukone) नेहमी एकत्र पाहणं पसंत करतात. सोशल मीडियावर दोघं एकमेकांसोबत फोटो शेअर करत असतात किंवा फोटोवर कमेंट करतात. दोघांनी केलेल्या कमेंट देखील व्हायरल होत असतात. अशातच शनिवारी दोघांची केमिस्ट्री पुन्हा एकदा सोशल मीडियावर पाहायला मिळाली. रणवीरनं इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग सेशन’ (तुम्ही काहीही विचारू शकता) ठेवलं होतं. त्यानं सेशन त्याच्या फॅन्ससाठी ठेवलं होतं मात्र यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी रणवीर सिंगला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. इतकंच काय तर या लिस्टमध्ये त्यांची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावाचीही भर पडली. तिनं रणवीरला टिपिकल पार्टनरप्रमाणे बॅक टू बॅक प्रश्न विचारले. खरतर दीपिका पदुकोणला जाणून घ्यायचं होतं की रणवीर घरी परत कधी येईल. या प्रश्नाला रणवीरनंही एक मजेशीर उत्तर दिलं, जेवण गरम कर बेबी, मी पोहोचतच आहे. या रिप्लायसोबत रणवीरनं दिपिकासाठी Kiss इमोजी पाठवले. रणवीरला दीपिका पदुकोण आणि अर्जुन कपूरनंही विचारला प्रश्न.

‘My Iron Lady’ प्रिया बापटसाठी सई ताम्हणकरच्या ‘वजनदार’ शुभेच्छा!

पुन्हा एकदा दिपिकानं रणवीरला सवाल केला.यावेळी तिनं त्याला विचारलं की ‘वाइफी’(आपल्या पत्नीबद्दल एका शब्दात सांगा) एका शब्दात. त्यावर रणवीरनं उत्तर दिलं क्विन(राणी). रणवीरचा खास मित्र अभिनेता अर्जुन कपूरनंही त्याला सवाल केला. अर्जुननं चॅट सेशनमध्ये विचारलं, तू इतका सेक्सी कसा बावा. यावर रणवीर म्हणाला, तुमची ट्रेनिंग.

Bigg Boss15:‘ये रिश्ता..‘फेम शिवांगी जोशी-मोहसीन खानला बिग बॉससाठी मिळाली इतक्या कोटींची ऑफर!

संबंधित बातम्या

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास रणवीर-दिपिका एकत्र आता स्पोर्ट्स ड्रामा 83 मध्ये दिसणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या