JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / दीपिका - भन्साळी पुन्हा एकदा एकत्र; बिग बजेट चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

दीपिका - भन्साळी पुन्हा एकदा एकत्र; बिग बजेट चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

दीपिका पुन्हा एकदा राणीच्या भूमिकेसाठी सज्ज झाली आहे. भन्साळींचा हा नवा प्रोजेक्ट असणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 25 मे : अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा चित्रपट म्हणजे हीट हे जणू समीकरणच बनलं आहे. अनेक हीट चित्रपट या जोडगोळीने दिले आहेत. आता त्यांच्या नव्या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता भन्साळी आणि दीपिका पुन्हा एकदा नव्या चित्रपटातून एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. गेले काही दिवस संजय लीला भन्साळी हे त्यांचे जुने प्रोजेक्ट ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘हिरा मंडी’ यामध्ये व्यस्त होते. पण आता त्यांच्या नव्या चित्रपटांची लवकरच घोषणा होणार आहे. भन्साळींचा दीपिकासोबत एक मेगा प्रोजेक्ट असणार आहे. यात दीपिका एका राणीची भूमिका साकरणार आहे. ‘बैजू बावरा’ अस या चित्रपटाचं नाव असणार आहे.

पैसे नसल्यानं सलमान खाननं या जिममधून केली बॉडी बिल्डिंगला सुरुवात; वर्षाला होती 60 रुपये फी

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, भन्साळी सध्या या नव्या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच भन्साळींना दीपिकाला या भूमिकेसाठी निवडायचं होतं. ‘रुपमती’ (Roopmati)  ही भूमिका दीपिका साकारणार आहे. दीपिका आणि भन्साळी यांनी या चित्रपटासाठी अनेकदा चर्चा तसंच भेटीही घेतल्या आहेत. अजून पेपरवर्क बाकी असलं, तरीही दोघांनीही चित्रपटासाठी सहमती दर्शवली आहे. लवकरच चित्रपटाच्या इतर कामकाजालाही सुरूवात होणार आहे.

संबंधित बातम्या

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट पुढील वर्षी मे ते जूनच्या दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 1952 चा चित्रपट ‘बैजू बावरा’चं हे नव रुप प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दीपिका व्यतिरिक्त अन्य भूमिकांविषयी अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता आणखी कोणत्या कलाकारांची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दीपिकाने याआधी ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ सारखे हीट चित्रपट भन्साळी यांच्यासोबत केले आहे. त्यामुळे या नव्या चित्रपटासाठी प्रेक्षक अतिशय उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या