मुंबई, 04 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar and Aamir Khan) डान्स दिवाने-3 च्या शोमध्ये विशेष अतिथी म्हणून दाखल झाली होती. या शो दरम्यान उर्मिलानं खूप छान डान्स करत चित्रपटांविषयी अनेक खुलासेही केले. या शोमध्ये तिनं आमिर खानच्या रंगीला या चित्रपटाबद्दल बोलताना एक पत्र लिहिण्याचा किस्साही सर्वांना सांगितला. उर्मिला (urmila matondkar) बोलताना म्हणाली की, ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे की, जेव्हा मी रंगीलासाठी डब करत होते, तेव्हा मी आमिरचा अभिनय पाहिला आणि त्याचे अद्भुत काम पाहून मला आश्चर्य वाटले. मी एका चाहत्याप्रमाणे आमिरला त्यावेळी पत्र लिहिलं होतं, ‘या चित्रपटातील तुझा अभिनय पाहिल्यानंतर तुला अनेक पत्र आणि पुरस्कारही मिळतील. पण, चाहत्यांकडून मिळालेले हे माझे पहिले पत्र असेल.’
उर्मिला डान्स रिअॅलिटी शोमध्ये विशेष अतिथी आहे आणि हा भाग या आठवड्याच्या शेवटी प्रसारित केला जाणार आहे. उर्मिलाच्या एका डान्सची क्लिप ऑनलाईन शेअर करण्यात आली आहे, ज्यात ती तिच्या लज्जा चित्रपटातील ‘आईऐ आ जायईऐ’ या हिट गाण्यावर डान्स करत आहे. उर्मिलाने निळ्या रंगाचा ड्रेस घातला असून ती डान्सच्या चांगल्या स्टेप करताना दिसत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित देखील तिच्यासोबत डान्स करताना दिसली, ती या शोची जज देखील आहे.
साजन चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण झाली साजन चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण झाल्याच्या सेलिब्रेशन व्हिडिओमध्ये उर्मिला माधुरीसोबत दिसली. माधुरी आणि उर्मिला यांनी ‘तू शायर है, मैं तेरी शायरी’ या गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये माधुरीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘साजन’ची 30 वर्षे एकत्र साजरी केल्याबद्दल धन्यवाद उर्मिला." हे वाचा - Whale ने बोटीला धक्का दिला आणि…, ‘मृत्यू’च्या तोंडात तरुणी; VIDEO पाहून भरेल धडकी आमिरच्या रंगीलामधील कामाचं कौतुक आमिरचे रंगीला चित्रपटासाठी त्यावेळी समीक्षकांकडून आणि चाहत्यांकडून खूप कौतुक करण्यात आलं होतं. फिल्मफेअर पुरस्कारामध्ये त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीमध्ये नामांकनही मिळालं होतं. मात्र, त्यावर्षी शाहरुख खानला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ साठी पुरस्कार मिळाला होता.