जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही
मुंबई, 22 जानेवारी: सुकेश चंद्रशेखर हा 200 कोटींचे मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहे. या प्रकरणात आजपर्यंत बॉलिवूडच्या दोन मोठ्या अभिनेत्री जॅकलिन आणि नोरा यांची नावे समोर आली होती. त्यानंतर या दोघींविषयी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी या प्रकरणावर अभिनेत्री नोरा फतेहीने घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात साक्ष दिली होती. त्यानंतर आता सुकेश चंद्रशेखरने त्यांच्या वकिलांमार्फत पुन्हा पत्र लिहिले आहे. या पत्रात सुकेशने बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच या दोघींविषयी बरेच खुलासे केले आहे. या पत्रात सुकेश चंद्रशेखरने लिहिले आहे की, “नोरा जॅकलीनचा नेहमी मत्सर करत होती आणि ती जॅकलीनच्या विरोधात माझे ब्रेनवॉश करत होती. नोराची इच्छा होती की मी जॅकलीनला सोडून तिला डेट करायला सुरुवात करावी.” एवढेच नाही तर सुकेश चंद्रशेखरने असेही सांगितले की, नोरा त्याला दिवसातून अनेक वेळा फोन करत असे. तो म्हणाला, “नोरा मला दिवसभरात 10 वाजण्याच्या सुमारास फोन करायची आणि मी फोन न दिल्यास ती सतत फोन करायची.” हेही वाचा - पठाण’ च्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शो मध्ये का नाही आला शाहरुख खान? अभिनेत्यानेच दिलं उत्तर इतकेच नाही तर सुकेश चंद्रशेखर यांनी नोरावर कोर्टात खोटे बोलल्याचा आरोपही केला. त्या पत्रात आरोपीने म्हटले आहे की, “नोराने कोर्टात दावा केला आहे की तिला कार नको होती आणि तिने ती स्वतःसाठीही घेतली नाही, हे मोठे खोटे आहे. त्याला CLA खूप स्वस्त वाटल्यामुळे बदलावे लागले. त्यामुळे आम्ही दोघे कार एकत्र निवडली आणि त्याचे स्क्रीनशॉट आणि चॅट्स ED कडे उपलब्ध आहेत."
नोराने नोंदवलेल्या जबाबात असा दावा केला आहे की, तिला गाडी नको होती. पण हे खोटं आहे, असा दावा सुकेशने केला आहे. यावेळी तो म्हणाला, “ती स्वत: तिची गाडी बदलण्यासाठी माझ्या मागे लागली होती. त्यावेळी तिच्याकडे मर्सिडीजची CLA गाडी होती. पण ती फार स्वस्त आहे असं तिला वाटायचे. त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून एका गाडीची निवड केली. माझ्या चॅट्स आणि स्क्रीनशॉट्स ईडीकडे आहेत. त्यामुळे त्यात काही खोटे नाही. खरंतर मला तिला रेंज रोव्हर द्यायची होती. पण त्यावेळी त्या गाड्या उपलब्ध नव्हत्या आणि तिला लगेचच गाडी हवी होती. त्यामुळे मी तिला बीएमडब्ल्यू एस सीरीज ही गाडी घेऊन दिली. ही गाडी तिने बराच काळ वापरली.’’ दरम्यान सुकेश सध्या तिहार तुरुंगात आहे. त्याच्यावर २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. जॅकलिन, नोरा यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींना त्याने महागड्या भेटवस्तू देऊन स्वतःच्या जाळ्यात ओढले होते. या दोघींशिवाय सारा अली खान, चाहत खन्ना यांचेही नाव जोडले जाते. सुकेशने फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रमोटर शिविंदर मोहन सिंह यांच्या पत्नी अदिती सिंह यांच्यासह अनेकांची फसवणूक केली आहे.