मुंबई, 25 जुलै: बॉलिवूडचा स्टाइल ऑयकॉन असलेला अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या न्यूड फोटोंशूटमुळे चर्चेत आला आहे. रणवीरने ‘पेपर’ या मासिकासाठी केलेलं न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून त्याचा चांगलाच बोलबाला पाहायला मिळतोय. रणवीरच्या या फोटोशूटवर पत्नी दीपिकासह अनेक अभिनेत्रींनी प्रतिक्रिया दिल्या आहे. सोशल मीडियावर तर रणवीरच्या न्यूड फोटोंवरुन भन्नाट मिम्स देखील व्हायरल होत असताना रणवीरला त्याचं हे न्यूड फोटोशूट चांगलंच महागात पडताना दिसत आहे. रणवीर सिंहच्या न्यूड फोटोंमुळे महिलांच्या भावना दुखावल्याची तक्रार सामाजिक संघटनेन मुंबई पोलिसांकडे केली आहे. चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून रणवीर विरोधात करण्यात आलेल्या या तक्रारीमुळे एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत महिलेनं रणवीरवर महिलांच्या भावना दुखावल्याचा आणि भारतीय संस्कृतीला धक्का पोहोचवल्याचा आरोप करण्यात आला आहे. रणवीर सिंहने केलेल्या न्यूड फोटोशूटनंतर तो सातत्यानं वादात सापडताना दिसत आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतरही यामागे काहीतरी राजकारण सुरू झाल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. काही राजकारण्यांनीही रणवीरच्या फोटोंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. हेही वाचा - BREAKING : सलमान खाननंतर आता कतरिना आणि विकीला जीवे मारण्याची धमकी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र चीफ अबु आझमी यांनी ट्विट करत, ‘रणवीर सिंहने काय करावं हा त्याचा प्रश्न आहे. त्याने नंगा नाच जरी केला तरी काही हरकत नाही. पण पब्लिक समोर न्यूड होणं ही कला आणि आझादी आहे तर हिजाब घालण्यावर विरोध कसा होऊ शकतो? असा सवाल त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे अनेक बॉलिवूड कलाकारांनीही रणवीरच्या न्यूड फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री आलिया भट्टची निर्मिती असलेल्या ‘डार्लिंग्स’ या सिनेमाच्या ट्रेलर लाँच वेळी आलियाला रणवीरच्या न्यूड फोटोंविषयी प्रश्न विचारला असता तिनं लाडक्या अभिनेत्याविषयी काहीही ऐकण्यास नकार दिला. रणवीरच्या न्यूड फोटोशूटमुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि काँट्रोवर्सीचा रणवीरला मात्र काहीही फरक नसल्याचं त्यानं म्हटलं आहे. एका मॅग्झीनला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, ‘लोक माझे कपडे आणि फॅशनबाबत काय बोलतात या गोष्टीचा मला काहीही फरक पडत नाही. त्यांना जे कपडे घालायला आवडतात तेच कपडे ते घालतात ते जेवण ते जेवतात. माझ्याविषयी कोणाला हरकत असेल तर मला त्याच्या कोणताही फरत पडत नाही’.