मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

BREAKING : सलमान खाननंतर आता कतरिना आणि विकीला जीवे मारण्याची धमकी

BREAKING : सलमान खाननंतर आता कतरिना आणि विकीला जीवे मारण्याची धमकी

या प्रकारानंतर विकी कौशलने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली

या प्रकारानंतर विकी कौशलने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली

या प्रकारानंतर विकी कौशलने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 25 जुलै : बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून धमकीचे सत्र सुरू झाले. सुपरस्टार सलमान खान (salaman khan) आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असताना प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा अभिनेता पती विकी कौशल (katrina kaif and vicky kaushal) या दोघांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल दोघे काही दिवसांपूर्वीच लग्नबेडीत अडकले होते. सुखी संसाराला सुरुवात झाल्यानंतर आता सोशल मीडियावर कुणीतरी जिवे मारण्याची  धमकी दिली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही धमकी देण्यात आली आहे. संतापजनक म्हणजे, सोशल मीडियावरून दोघांनाही जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकारानंतर विकी कौशलने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. विकी कौशलच्या तक्रारीवरून सांताक्रुज पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोघांना धमकी कुणी दिला, याचा तपास पोलीस करत आहे.

(ज्वालामुखीच्या उद्रेकानं पसरली राख; भर दिवसा अंधार! Photos पाहून उडेल थरकाप)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी  सलमान खानला (Salman Khan)  धमकी देण्यात आली होती. सलमानला पोलिसांकडून संरक्षण देण्यात आलं आहे. 5 जून रोजी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचं पत्र मिळालं होतं. 'सलमानचाही सिद्धू मूसेवाला करू', अशी धमकी त्याला देण्यात आली होती. या धमकीची माहिती महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाला मिळताच सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर क्राईम ब्राँचची ( Mumbai Crime Branch) एक टिम तात्काळ दाखल झाली आहे. ज्या ठिकाणी धमकीचं पत्र मिळालं त्या ठिकाणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.  सलमान स्वत: घराबाहेर येऊन क्राइम ब्राँचच्या टिमला सहकार्य करताना दिसला. आता याप्रकरणी त्याने जबाब नोंदवल्याचे समोर आलं आहे.

First published: