JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Tanmay Bhat: ललित-सुष्मिताच्या Viral फोटोला कॉमेडियन तन्मय भटने दिला निराळा ट्विस्ट

Tanmay Bhat: ललित-सुष्मिताच्या Viral फोटोला कॉमेडियन तन्मय भटने दिला निराळा ट्विस्ट

सध्या देशभरात चर्चित असणाऱ्या ललित आणि सुष्मिता यांच्या नात्यावर कॉमेडियन तन्मय भट एका हटके पद्धतीने रिऍक्ट झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 17 जुलै: सध्या सगळीकडे ज्या एका कपलच्या अफेअरची चर्चा चालू आहे ते म्हणजे ललित मोदी आणि सुष्मिता सेन. या दोघांच्या नात्याबद्दल ललित मोदी यांनी जाहीरपणे कबुली दिल्यानंतर त्यांच्याबद्दलची चर्चा थांबायचं नाव घेत नाहीये. दोघांच्या भूतकाळातल्या अनेक गोष्टी तसंच इतरही अनेक पैलूंबद्दल बरंच बोललं जात आहे. अशातच तन्मय भट या कॉमेडियनने सुद्धा ललित आणि सुष्मिताच्या खास नात्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ललित यांनी शेअर केलेल्या अनेक फोटोपैकी एका फोटोला कॉमेडी ट्विस्ट देत तन्मयने तसाच फोटो आपल्या रूममेटसोबत रिक्रिएट केला आहे. याबद्दलची धमाल पोस्ट सध्या बरीच viral होत आहे. ललित आणि सुष्मिताच्या (tanmay bhat recrated viral photo of lalit and sushmita) रोमँटिक फोटोला आपल्या तुफान विनोदी अंदाजात रिक्रिएट करताना तन्मय दिसून येत आहे. ललित यांच्या फोटोचं अनुकरण करत तन्मय सोफ्यावर झोपलेला दिसत आहेत आणि त्याने त्याच रूममेट नवीद त्याच्या बाजूला बसला आहे. दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघून हसत आहेत असं दिसून येत आहे तसंच तन्मयने नवीदचं डोकं दोन्ही हातांनी धरल्याचं दिसत आहे. या फोटोवर कॅप्शन देत तन्मय लिहितो, “एक नवं आयुष्य, एक नवी सुरुवात. प्रेम आहे पण याचा अर्थ लग्न झालं असं नाही. पण ते ही देवाच्या कृपेने एक दिवस नक्की होईल. आत्ता मी अशी घोषणा करू इच्छितो की आम्ही दोघे रूममेट आहोत”

संबंधित बातम्या

रूममेटशी असलेलं हे धमाल नातं जाहीर करत तन्मयने ललित आणि सुष्मिताच्या फोटोचं मजेशीर पद्धतीने अनुकरण केल्याचं दिसत आहे. त्याच्या या भन्नाट कल्पनेचं भयानक कौतुक होताना दिसत आहे. हे ही वाचा-  Lalit Modi Sushmita Sen: सुष्मितासोबतच्या नात्यावर ‘फरार’ म्हणून गॉसिप करणाऱ्यांना ललित यांचं थेट उत्तर, म्हणाले… या फोटोवर त्याच्या अनेक चाहत्यांनी तसंच काही प्रसिद्ध influencer आणि कॉमेडीयन्सनी कमेंट्स केल्याचं दिसत आहे. ललित आणि सुष्मिता यांचं हे नातं सध्या फार प्रसिद्ध होत आहे. ललित यांनी नुकतंच होणाऱ्या गॉसिप आणि काही नकारत्मक कमेंट्सना निशाणा बनवून स्वतःच मत सुद्धा व्यक्त केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या