छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे.
मुंबई, 03 जून : आजकाल अनेक ऐतिहासिक घटनांवर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टी देखील यात मागे नाही. आता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली होती. त्याचा या चित्रपटातील लूक देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्याच्यानंतर आता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. एक मराठमोळा दिग्दर्शक या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून लवकरच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. विकी कौशल आणि सारा अली खान यांच्या जरा हटके जरा बचके या चित्रपटाची सुरुवात चांगली झाली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी पाच कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. विकी कौशल आता त्यानंतर एका मोठ्या प्रोजेक्ट्ला सुरुवात करणार आहे. आर्मी ऑफिसरच्या भूमिकेनंतर विकी कौशल आता ऐतिहासिक चित्रपटात दिसणार असून नुकतीच त्याची घोषणा झाली आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. लक्ष्मण उतेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. एवढंच नाही तर अभिनेत्याने या चित्रपटासाठी वजन वाढवायला देखील सुरुवात केली आहे. Adipurush : काय सांगता! प्रभासच्या ‘आदिपुरुष’ने रिलीजपूर्वीच कमावले कोट्यवधी; केलाय मोठा विक्रम ‘जरा हटके जरा बचके’ रिलीज झाल्यानंतर विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांच्या बायोपिकची तयारी सुरू केली आहे. या चित्रपटासाठी विकी सध्या तलवारबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. चित्रपटासाठी तलवारबाजी शिकण्यासाठी विकी कौशल बँकॉकमध्ये एक महिना घालवणार आहे. हा चित्रपट अॅक्शन आणि इमोशनने भरलेला असेल. चित्रपटाशी अनेक जनभावना जोडल्या गेल्या आहेत त्यामुळे पूर्ण संशोधन होऊनच हा चित्रपट बनवला जाणार असल्याची माहिती आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित या चित्रपटाचं नाव ‘छावा’ असं असणार आहे. विकी कौशलचं नाव जरी मुख्य भूमिकेसाठी निश्चित झालेलं असलं. तरी संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईंची भूमिकाकोण साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही. या भूमिकेसाठी निर्माते चांगल्या अभिनेत्रीच्या शोधात आहेत. पण या भूमिकेसाठी रश्मिका मंदान्ना, क्रिती सेनन आणि सारा अली खान या अभिनेत्रींच्या नावाची सर्वात जास्त चर्चा आहे. या अभिनेत्रींच्या कास्टिंगवर नेटिझन्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. तर काही जण या भूमिकेसाठी एखादी मराठी अभिनेत्रीच शोभून दिसले असं देखील म्हणत आहेत.