चांगला समाज घडवण्यात मुलांचं संगोपन हे सर्वात मोठे योगदान आहे. लहानपणीचा अनुभव एखाद्या व्यक्तीच्या आत्मविश्वासावर (Confidence) परिणाम करतो. त्यामुळे आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता (Independence) वाढते किंवा कमी होते,ज्याला स्वतः पालकही जबाबदार असू शकतात.
मुंबई, 20 जुलै- सोमवारी रात्री एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलिवूड(Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राला(Raj Kundra) अश्लील चित्रफित रेकॉर्ड करने आणि त्या प्रसिद्ध केल्याचा आरोप लागला आहे. सोमवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या अटकेनंतरचं राज कुंद्रा नेमका कोण आहे? त्याचं आपल्या पहिल्या पत्नीशी नातं का तुटलं? आणि शिल्पा शेट्टी त्याच्या आयुष्यात कशी आली? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित झाले आहेत. आज आपण याबद्दलचं जाणून घेणार आहोत. सोमवारी रात्री अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. हा राज कुंद्रा नेमका आहे तरी कोण? चला तर मग जाणून घेऊया. राज कुंद्राचा जन्म 9 सप्टेंबर 1975 ला लंडनमध्ये झालाहोता. त्याचे वडील हे पंजाबी होते. आणि ते एक मध्यम उद्योजक होते. तसेच त्याची आई एका शॉपमध्ये असिस्टंट म्हणून काम करत होती. सध्या राज कुंद्रा एक नामांकित उद्योजक आहे. (हे वाचा:
BREAKING : राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी केली अटक
) राज कुंद्राने 2003 मध्ये कविता कुंद्रासोबत पहिलं लग्न केलं होतं. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकलं नव्हतं. राज आणि कविताने अवघ्या तीन वर्षात म्हणजे 2006 ला एकमेकांशी घटस्फोट घेतला होता. आणि त्यानंतर 2007 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत लग्न केल होतं. एकीकडे कविताने शिल्पा शेट्टीमुळे आपल्या नात्यात दुरावा आल्याचा आरोप केला होता. तर दुसरीकडे कुंद्राने कविताचं राजच्या बहिणीच्या नवऱ्यासोबत अफेयर असल्याचं समजल्यामुळे हे नातं तुटलं होतं, असं नुकताच राजने म्हटलं आहे.