JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Armaan Kohli Drug Case: अरमानमुळे सुपरस्टार बनला शाहरुख! किंग खान ने स्वत: केला होता खुलासा

Armaan Kohli Drug Case: अरमानमुळे सुपरस्टार बनला शाहरुख! किंग खान ने स्वत: केला होता खुलासा

NCB Arrested Armaan Kohli: अरमान कोहलीच्या अटकेनंतर शाहरुख खानचं एक जुनं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुखने असं म्हटलं होतं की अरमान कोहलीमुळे तो सुपरस्टार बनला आहे.

जाहिरात

Armaan Kohli and Shah Rukh Khan

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉस 7 चा स्पर्धक राहिलेल्या अरमान कोहलीला (NCB Arrested Armaan Kohli) त्याच्या जुहू स्थित घरातून अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) छापेमारी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अभिनेता अरमान कोहलीच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. एनसीबीच्या मुंबई ब्रांचद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान अरमानच्या अटकेनंतर शाहरुख खानचं एक जुनं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुखने असं म्हटलं होतं की अरमान कोहलीमुळे तो सुपरस्टार बनला आहे. घटना अशी आहे की 1992 साली आलेल्या ‘दिवाना’ सिनेमातून शाहरुख खानने (Shah Rukh Khan Debut) बॉलिवूड डेब्यू केला होता. शाहरुखची जी भूमिका होती ती आधी अरमान कोहलीला ऑफर करण्यात आली होती. अरमानने या सिनेमासाठी होकार देखील दिलास होता, इतकंच नव्हे तर त्याचा फोटो असणारं सिनेमाचं पोस्टर देखील छापण्यात आलं होतं. मात्र काही कारणामुळे त्याने नंतर सिनेमा करण्यास नकार दिला आणि हा सिनेमा शाहरुखला ऑफर झाला. त्यानंतर शाहरुखची कारकीर्द सर्वांनाच माहित आहे. या सिनेमाने बॉलिवूडला एक मोठा सुपरस्टार दिला. हे वाचा- अभिनेता अरमान कोहलीला अटक! Drug Case मध्ये छापेमारीनंतर NCB ची कारवाई दिवानामध्ये शाहरुखने केवळ काम केलं नाही तर हा सिनेमा सुपरहिट देखील झाला. 2016 साली  ‘यारों की बारात’या शोमध्ये शाहरुखने या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचे श्रेय अरमान कोहलीला दिले होते. शाहरुखने या शोमध्ये असं म्हटलं होतं की, ‘मी स्टार बनण्यामागे अरमान कोहलीचा हात आहे. तो दिवंगत दिव्या भारतीसह बनलेल्या ‘दिवाना’च्या पोस्टरवर देखील होता. माझ्याकडे ते पोस्टर अजूनही आहे. मला स्टार बनवण्यासाठी धन्यवाद’. हे वाचा- ‘अनिरुद्ध देशमुख हरवला आहे, संजनाला संपर्क करा…’ VIRAL होतेय ही पोस्ट अरमान कोहली (Armaan Kohli Films) याने 1992 साली आलेल्या ‘विरोधी’ या सिनेमातून डेब्यू केला होता. यानंतर 10 वर्षाने त्याने ‘जानी दुश्मनः एक अनोखी कहानी’ मधून कमबॅक केलं. यामध्ये त्याने मुख्य खलनायकाची भूमिका निभावली होती. त्याचा हा अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर अरमानने विशेष चित्रपट केले नाही. बिग बॉस 7 (Bigg Boss 7) मध्ये तो स्पर्धक होता. यावेळी त्याने विशेष प्रसिद्धी मिळवली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या