JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / माधुरी दीक्षित ते विकी-कतरिना... कोट्यवधी कमावूनही भाड्याच्या घरात राहतात हे बॉलिवूड सुपरस्टार्स!

माधुरी दीक्षित ते विकी-कतरिना... कोट्यवधी कमावूनही भाड्याच्या घरात राहतात हे बॉलिवूड सुपरस्टार्स!

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की हे फेमस बॉलिवूड सेलेब्रिटी (Bollywood Celebs who lives on rent in Mumbai) कोट्यवधी कमावूनही भाड्याच्या घरात राहतात. बॉलिवूडची अनेक बडी नाव या यादीमध्ये आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 मार्च: बॉलिवूडमध्ये (Bollywood Update) असणाऱ्या सुपरस्टार त्यांच्या शाही लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. त्यांना मिळणारं मानधन देखील थक्क करणारं असतं. अशावेळी तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की हे फेमस बॉलिवूड सेलेब्रिटी (Bollywood Celebs who lives on rent in Mumbai) कोट्यवधी कमावूनही भाड्याच्या घरात राहतात. बॉलिवूडची अनेक बडी नाव या यादीमध्ये आहेत. हे सर्व कलाकार मुंबईतील हायक्लास सोसायटी, पॉश एरिआजमध्य राहतात. त्यामुळे त्याठिकाणी त्यांना द्यावं लागणारं रेंट देखील तगडं आहे. जाणून घ्या कोणते कोणते सेलेब्स भाड्याच्या घरात राहतात आणि त्याकरता त्यांना किती भाडं द्यावं लागतं. पत्रिका ने याविषयी वृत्त दिले आहे.

विकी कौशल-कतरिना कैफ (Vicky Kaushal and Katrina Kaif) विकी-कतरिना या कपलचे अलीकडेच लग्न झाले असून त्यांनीही भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या जुहू परिसरातील राजमहलमध्ये आठव्या फ्लोअरवर त्यांचे घर आहे. त्यांनी पाच वर्षांसाठी भाड्याने घेतलेल्या या घराचे भाडे जवळपास 8 लाख रुपये महिना आहे. लग्नानंतर हे कपल याठिकाणी एकत्र राहत आहे. हे वाचा- अंकिता लोखंडे म्हणाली मी प्रेग्नंट आहे…. कंगनाच्या Lock Upp मध्ये काय केला खुलासा?

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यामध्ये पहिलं नाव घेता येईल ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचं. मुंबईतील सधन एरिआमध्ये माधुरी तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासह राहते. मीडिया अहवालानुसार याठिकाणी माधुरी 12.50 लाख रुपये महिना इतके भाडे देत आहे. बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा माधुरी सक्रीय होत आहे, त्यामुळेच तिने हे मुंबईतील लॅव्हिश घर भाड्याने घेतले आहे.

जाहिरात

हृतिक रोशन (Hrithik Roshan) हृतिक रोशन हे बॉलिवूडमधील मोठे नाव आहे. हा अभिनेता देखील मुंबईत भाड्याच्या घरातच राहतो. जुहूमधील हे घर हृतिक 2020 साली भाड्याने घेतलं असून त्यासाठी तो 8 लाख 25 हजार रुपये महिना इतकं भाडं देतो. हे वाचा- ऐश्वर्या पुन्हा प्रेग्रेंट? अभिषेक बच्चन अन् आराध्यासोबतचे PHOTOS पाहून होतेय अशी चर्चा

जाहिरात

कृती सेनॉन (Kriti Sanon) बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांचे अंधेरी याठिकाणचे अपार्टमेंट भाड्याने घेतल्यानंतर अभिनेत्री कृती सेनॉन विशेष चर्चेत आली होती. हे घर अंधेरीच्या लोखंडवाला या सधन परिसरात एटलांटिस बिल्डिंगमध्ये आहे. याकरता ती 10 लाख रुपये भाडं देते. याआधी कृती तिच्या कुटुंबीयांसह राहत होती.

जाहिरात

दीपिका पादुकोण-रणवीर सिंह (Deepika Padukone-Ranveer Singh) दीपिका पादुकोण-रणवीर सिंह हे कपल मुंबईतील प्रभादेवी याठिकाणी असणाऱ्या एका टॉवरमधील फ्लॅटमध्ये राहते. ज्या फ्लॅटचं भाडं 7 लाख 25 हजार रुपये इतकं आहे.

जाहिरात

जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) बॉलिवूडमधील ही ‘श्रीलंकन ब्युटी’ जॅकलीन फर्नांडिस हिने अभिनेत्री प्रियंका चोप्राचे घर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता तिने 3 वर्षांचे काँन्ट्रॅक्ट केले असून ती 6 लाख 78 हजार महिना इतकं भाडं भरणार आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या