अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) बॉलिवूडची एक फेमस फॅमिली आहे. ही फॅमिली आउटिंगसाठी बाहेर पडल्यानंतरही पापारॅझी त्यांचे फोटो काढण्यासाठी तयार असतात. अलीकडेच ही फॅमिली पुन्हा एकदा कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बच्चन कुटुंबीय अलीकडेच नाउट आउटिंगसाठी गेले असतानाचे हे फोटो आहेत.
अलीकडे, एएनआय न्यूजशी संभाषणात अभिषेकने खुलासा केला होता की, ऐश्वर्याने त्याला नकारात्मक कमेंट्सचा सामना करण्यास मदत केली. तो म्हणाला की माझ्या पत्नीने मला सांगितले की तुम्हाला 10,000 सकारात्मक कमेंट्स मिळतात पण एका नकारात्मक कमेंटचा तुमच्यावर परिणाम होतो. तो म्हणाला होता की ऐश्वर्याने त्याला समजावले की तू सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित कर. (फोटो सौजन्य- विरल भयानी)