JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / IND Vs ENG: करीनाने पहिल्यांदाच तैमुरला नेलं स्टेडिअमवर; पाहा त्याची रिअ‍ॅक्शन

IND Vs ENG: करीनाने पहिल्यांदाच तैमुरला नेलं स्टेडिअमवर; पाहा त्याची रिअ‍ॅक्शन

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सध्या पती सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि आपली दोन मुले तैमूर अली खान आणि जेह (Taimur & Jeh) यांच्यासोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. काही दिवसांपासून हे सर्वजण इंग्लंडमध्ये धम्माल करताना दिसून येत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जुलै- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सध्या पती सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि आपली दोन मुले तैमूर अली खान आणि जेह (Taimur & Jeh) यांच्यासोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. काही दिवसांपासून हे सर्वजण इंग्लंडमध्ये धम्माल करताना दिसून येत आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावरून सतत तिच्या व्हेकेशनचे अपडेट्स फॅन्स आणि फॉलोअर्ससोबत शेअर करत असते. दरम्यान अभिनेत्रीची नवी सोशल मीडिया पोस्ट प्रचंड चर्चेत आहे. यामध्ये ती आपला मोठा मुलगा, तैमूरसोबत केनिंग्टन ओव्हल येथे भारत व्हर्सेस इंग्लंडचा सामना एन्जॉय करताना दिसत आहे. करिना कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या पती आणि मुलांसोबतचे फोटो शेअर करत असते. चाहते नेहमीच या फोटोंवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देताना दिसून येतात. दरम्यान बेबोने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती मोठा मुलगा तैमूरसोबत क्रिकेट स्टेडियमवर दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिलंय, “माझा पहिला सामना… ‘भारत विरुद्ध इंग्लंड’.” तत्पूर्वी करिनाने आणखी एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये करिना आणि सैफ आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत जेवणाचा आस्वाद घेताना दिसले होते. या दोघांनी लंडनमधील डॅफनेज रेस्टोरंटमधून हा फोटो शेअर केला होता. **( हे वाचा:** सारा अली खानच्या ‘डेटिंग प्रपोजल’वर साऊथ स्टार विजय देवरकोंडाने दिलं उत्तर, नेमकं काय म्हणाला अभिनेता? ) यापूर्वी सारा अली खाननेसुद्धा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. यामध्ये सारा आणि इब्राहिम वडील सैफ आणि भाऊ जेहसोबत दिसून आले होते. ते दोघेही लंडनमध्येच होते. वास्तविक सारा आणि इब्राहिम सैफ आणि अमृताची मुले आहेत. तर तैमूर आणि जेह करिना आणि सैफची मुले आहेत. मात्र सावत्र भावंडे असूनदेखील त्यांच्यामध्ये प्रचंड प्रेम पाहायला मिळतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या