JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / जहांगीरची पहिली विदेश ट्रीप; सैफ-करीना मुलांसोबत एयरपोर्टवर झाले स्पॉट

जहांगीरची पहिली विदेश ट्रीप; सैफ-करीना मुलांसोबत एयरपोर्टवर झाले स्पॉट

16 ऑगस्टला सैफचा वाढदिवस आहे. पतीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी करीनाने मालदीवचं नियोजन केलं आहे.

जाहिरात

नवीन नातं, नवीन दृष्टीकोनाने बनवा. भूतकाळातल्या आठवणी भविष्यात डोकावणार नाहीत याची काळजी घ्या. पूर्वीच्या जोडीदाराच्या आठवणी काढत बसू नका. त्यामुळे दुसऱ्या जोडीदाराच्या मनात गैरसमज निर्माण होतील.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 ऑगस्ट- गेली अनेक दिवस करीना (Kareena Kapoor) आणि सैफ (Saif Ali Khan) जहांगीरच्या(Jehangir) नावावरून चर्चेत आले आहेत. आपल्या दुसऱ्या मुलाच्या नावावरून हे दोघेही वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. यादरम्यान नुकताच सैफ आणि करीना भारताबाहेर सुट्टीसाठी रवाना झाले आहेत. करीना आणि सैफ आपल्या दोन्ही मुलांसोबत मालदीवला जायला निघाले आहेत. सैफचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे नियोजन केलं असल्याचं कळत आहे. जेह म्हणजेच करीनाचा लहान मुलगा जहांगीर याची ही पहिलीचं परदेशची यात्रा आहे.

संबंधित बातम्या

अभिनेत्री करीना कपूर आपल्या प्रेग्नेन्सीमुळे खूपच चर्चेत होती. करीनाने काही महिन्यांपूर्वीच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. यादरम्यानचं करीनाने आपलं प्रेग्नेसीवर आधारित ‘करीना कपूर खान्स प्रेग्नेन्सी बायबल’ हे पुस्तक प्रकशित केलं होतं. यामध्ये तिने आपल्या प्रेग्नेन्सीदरम्यानचे अनेक खुलासे केले आहेत. यामध्ये तिच्या दुसऱ्या मुलाच्या नावाचा उल्लेख तिने जहांगीर असा केला आहे. त्यामुळे करीना आणि सैफ वादात अडकले होते. युजर्सना तैमुरप्रमाणेचं हे नावदेखील पसंत पडलेलं नाहीय. (हे वाचा: BB OTT: नेहा भसीनने रिद्धिमा पंडितला केलं KISS; आणि त्यानंतर जे घडलं… ) यादरम्यानचं करीना आणि सैफने मालदीवला जाण्याचं ठरवलं. आणि ते मालदीवसाठी रवानादेखील झाले आहेत. नुकताच हे दोघेही आपल्या दोन्ही मुलांसोबत मुंबई एयरपोर्टवर स्पॉट करण्यात आले आहेत. पिंकविलाने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर सैफ आणि करीनाचा व्हिडीओ शेयर केला आहे. करीना आणि सैफचा छोटा मुलगा जहांगीर याचा हा पहिला विदेश दौरा आहे. 16 ऑगस्टला सैफचा वाढदिवस आहे. पतीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी करीनाने मालदीवचं नियोजन केलं आहे. यासाठी सैफने आपल्या शुटींगमधून काही दिवसांचा ब्रेक घेतला आहे. (हे वाचा: ठरलं! सोनमची बहीण करणार लग्न; पाहा कोण आहे अनिल कपूरचा दुसरा जावई   ) सध्या सैफ कॉमेडी हॉरर असणाऱ्या ‘भूत पुलिस’ आणि क्रिती सेनन आणि प्रभाससोबत ‘आदिपुरुष’ या चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. मालदीवच्या नियोजनासाठी सैफने ब्रेक घेतला आहे. कारण त्याला आपल्या कुटुंबांसोबत वेळ घालवायचा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या