JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / काँग्रेस आमदाराच्या मुलीचा ब्रालेस ड्रेसमध्ये हॉट अवतार, PHOTOS व्हायरल

काँग्रेस आमदाराच्या मुलीचा ब्रालेस ड्रेसमध्ये हॉट अवतार, PHOTOS व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री आयशा शर्माचं ब्रालेस फोटोशुट सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आहे. आयशाचे वडील अजित शर्मा बिहारच्या भागलपूर मतदारसंघाचे आमदार असून, कॉंग्रेसमध्ये त्यांचं चांगलं प्रस्थ आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : अभिनेत्रींचं बोल्ड फोटोशुट (Bold Photoshoot) ही काही नवीन गोष्ट नाही. खूपवेळा अनेक अभिनेत्रींनी आपले ग्लॅमरस फोटो (Glamours photos) चाहत्यांसाठीही सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत आणि त्याची चर्चाही झाली आहे. त्यातही ब्रालेस कपडे (Braless Dress) घालून अनेक अभिनेत्रींना आपला जलवा दाखवला आहे. प्रियांका चोप्रा, दीपिका पदूकोण, मलायका अरोरा यांनी तर, अशा फोटोशुटने फारच अटेन्शनही मिळवलं होतं. पण, आता चर्चा आहे. अभिनेत्री आयशा शर्मा (Ayesha Sharma**)** हिची.तिने नुकताच ब्रालेस फोटोशुट केलं आहे आणि फोटो इन्टाग्राम आणि व्टिटरवर शेअर केले आहेत. आयशा शर्मा बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करत असलेली अभिनेत्री नेहा शर्मा हिची बहीण तर आहेच पण, या दोघीही राजकीय घराण्यातल्या आहेत. पण, त्यांनी आपल्यासाठी वेगळं क्षेत्र निवडून राजकारणात न जाण्याचा पर्याय निवडला आहे. आयशा आणि नेहा यांचे वडिल अजित शर्मा बिहारच्या भागलपूर मतदार संघाचे आमदार असून, ते काँग्रेसचं विधिमंडळ नेतेही आहेत आणि कॉंग्रेसमध्ये त्यांचं चांगलं प्रस्थ आहे. तर, आयशाने 2015 मध्ये तेलगू सिनेमा ‘शिवम’ मधून करियरची सुरुवात केली आहे. ( मधू मंटेनांच्या रामायणात रणबीर कपूर ‘राम’ तर हृतिक रोशन होणार ‘रावण’? ) तर, जॉन इब्राहिमच्या ‘सत्यमेव जते’मधून तिने बॉलिवूडच्या करिअरला सुरूवात केली आहे. खूपदा ती आपल्या बोल्ड कपड्यांमुळे ट्रोलही झाली आहे. ( रक्षाबंधनदिवशी सुशांतच्या आठवणीत श्वेता भावुक; शेअर केला Unseen Photo ) तर, सध्या आयशा शर्मा प्रचंड चर्चेत आहे. तिने निळ्या रंगाच्या जंपसूटमध्ये फोटोशुट केलं आहे. शॉर्टपॅन्ट स्टाइल जम्पसूटमध्ये तिने आपल्या शर्टचे पुढचे बटण उघडले आहेत आणि त्यात तिने ब्रा घातली नाही. तिने बरेच बोल्ड़ फोटो पोस्ट केले आहेत.

संबंधित बातम्या

तिच्या या फाटोंवर कमेंन्टचा वर्षाव होत आहे. बरेच जण तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत. याआधीही आयशा शर्माने असे बोल्ड फोटो काढले आहेत. याआधी तिने फक्त शर्ट घालून ब्रालेस फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. त्यानंतर पॅन्टलेस फोटोशुटही व्हायरल झालं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या