जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / रक्षाबंधनदिवशी सुशांतच्या आठवणीत श्वेता भावुक; शेअर केला Unseen Photo

रक्षाबंधनदिवशी सुशांतच्या आठवणीत श्वेता भावुक; शेअर केला Unseen Photo

रक्षाबंधनदिवशी सुशांतच्या आठवणीत श्वेता भावुक; शेअर केला Unseen Photo

श्वेता सिंह किर्ती (Shweta Singh Kirti) हिने दिलेल्या शुभेच्छा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. तिने सुशांतसोबतचा एक फोटो शेअर करून बालपणीच्या आठवणींना पुन्हा एकदा नव्याने उजाळा दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 22 ऑगस्ट**:** आज देशभरात रक्षाबंधनचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. (Raksha Bandhan 2021) सर्वसामान्य लोकांसोबतच सेलिब्रिटी देखील आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत रक्षाबंधनच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) बहिणी श्वेता सिंह किर्ती (Shweta Singh Kirti) हिने दिलेल्या शुभेच्छा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. तिने सुशांतसोबतचा एक फोटो शेअर करून बालपणीच्या आठवणींना पुन्हा एकदा नव्याने उजाळा दिला आहे.

जाहिरात

मधू मंटेनांच्या रामायणात रणबीर कपूर राम तर हृतिक रोशण होणार रावण? पाहा काय आहे चित्रपट श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुशांतसोबतचा एक बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुशांत आणि श्वेता हातात हात घेऊन उभे असल्याचं पाहायला मिळतंय. “लव्ह यू भाई, आपण कायम एकत्र असू” अशा आशयाची कमेंट लिहित तिने सुशांतच्या चाहत्यांना रक्षाबंधनच्या शुभेच्य़ा दिल्या. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सुशांतनं 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूला आज एक वर्ष उलटून गेलं आहे. मात्र मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हे प्रकरण दिवसेंदिवस आणखीनच गुंतत चाललं आहे. आधी मुंबई पोलीस, मग इन्कम टॅक्स, पुढे सीबीआय आणि आता NCB द्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती ही संशयीत आरोपी आहे. तिनं आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी सुशांतला ड्रग्स देऊन आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं असे आरोप तिच्यावर करण्यात आले आहेत. शिवाय ड्रग्ज प्रकरणी तिला अटकही करण्यात आली होती. गेल्या कित्येक महिन्यांपासून तिची चौकशी सुरु आहे. या चौकशीत तिनं अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नावं घेतली. सध्या तिनं केलेल्या दाव्यांची उलट तपासणी केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात