JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मी प्रेग्नेंट नाहीय..', नोरा फतेहीला का द्यावं लागलं स्पष्टीकरण? सोशल मीडियावर VIDEO होतोय VIRAL

'मी प्रेग्नेंट नाहीय..', नोरा फतेहीला का द्यावं लागलं स्पष्टीकरण? सोशल मीडियावर VIDEO होतोय VIRAL

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) आपल्या डान्स आणि सौंदर्याने सर्वानांच वेड लावत आहे. ती सध्या नीतू कपूर आणि कोरिओग्राफर मर्जी पेस्टनजी यांच्यासोबत ‘डान्स दिवाने ज्युनियर्स’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून झळकत आहे. या डान्स शोच्या सेटवरून अनेक रंजक व्हिडिओ समोर येत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 जुलै- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नोरा फतेही   (Nora Fatehi)  आपल्या डान्स आणि सौंदर्याने सर्वानांच वेड लावत आहे. ती सध्या नीतू कपूर आणि कोरिओग्राफर मर्जी पेस्टनजी यांच्यासोबत ‘डान्स दिवाने ज्युनियर्स’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून झळकत आहे. या डान्स शोच्या सेटवरून अनेक रंजक व्हिडिओ समोर येत आहेत. एक व्हायरल व्हिडीओमध्ये नोरा फतेही तिच्या एका वक्तव्यामुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये नोरा, मर्जी, नीतू कपूर आणि टेरेन्स लुईससोबत दिसत आहे. नोरा या व्हिडीओमध्ये आपण प्रेग्नेंट नसल्याचं सांगत आहे. ज्यावर इतर सर्व जज तसेच चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. वास्तविक मर्जी यामध्ये म्हणताना दिसत आहे की, आम्ही प्रेग्नेंसीमध्ये होणाऱ्या वेदनांबद्दल बोलत आहोत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या

या शोच्या सेटवरुन सतत काही ना काही हटके व्हिडीओ समोर येत असतात. नोरा फतेही सेटवर उपस्थित असलेल्या सहकलाकरांसोबत कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मर्जी नोराला चिडवताना दिसत आहे. तसेच त्यांच्या मागे काही प्रेक्षक बसलेले दिसत आहेत. या चारही कलाकारांनी डान्स शोच्या सेटवर खूप मस्ती केल्याचं व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे. नोराचे चाहते व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. **(हे वाचा:** लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबद्दल आलियाचं रोखठोक मत, रणवीर-करण जोहरला हसू अनावर ) या व्हिडीओमध्ये नोरा स्वतःमध्ये मग्न असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान मर्जीने म्हटलं, ‘आम्ही सर्वजण सध्या प्रेग्नेंसीमध्ये होणाऱ्या वेदनांबाबत बोलत आहोत. परंतु नोरा स्वतःमध्ये बिझी आहे. यावर ती म्हणते, हो कारण सध्या तरी मी प्रेग्नंट नाहीय. यावर आश्चर्य व्यक्त करत मर्जीने मजेशीर उत्तरे देत म्हटलं, - ‘तुम्ही हे जगाला सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या