JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Hero No. 1! अनेकांसाठी देवदूत ठरलेल्या Sonu Sood ला मिळतोय कामांचा मोबदला, अभिनेत्यावर चित्रपटांचा वर्षाव

Hero No. 1! अनेकांसाठी देवदूत ठरलेल्या Sonu Sood ला मिळतोय कामांचा मोबदला, अभिनेत्यावर चित्रपटांचा वर्षाव

कोरोना महामारीमध्ये(Corona Pandemic) अहोरात्र लोकांची सेवा करत बॉलिवूडअभिनेता सोनू सूद (Sonu Sood) लोकांसाठी आत्ता रियल हिरो बनला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जुलै- कोरोना महामारीमध्ये (Corona Pandemic) अहोरात्र लोकांची सेवा करत बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) लोकांसाठी आत्ता रियल हिरो बनला आहे. इतकचं नव्हे तर कित्येक लोकांनी त्याला देवाचा दर्जा दिला आहे. आपल्या मनाच्या मोठेपणामुळे सोनू आज कोट्यावधी लोकांच्या मनावर राज्य करत आहे. कोरोना महामारीमध्ये करत असलेल्या लोकांच्या सेवेमुळे सोनूची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतचं आहे. याचा परिणाम आत्ता त्याच्या प्रोफेशनल लाईफवरसुद्धा स्पष्ट दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

कोरोना महामारी जसजशी सामान्य होतं आहे, तसं सोनूनेही चित्रपटांसाठी काम करायला सुरुवात केली आहे. तसेच आत्ता सोनू आपल्या प्रोफेशन आणि सोशल लाईफमध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. नुकताच सोनूने यावर चर्चा करत म्हटलं आहे, की सामाजिक कार्यामुळे त्याच्या प्रोफेशनल लाईफवर कोणताच प्रतिकूल परिणाम झालेला नाही. उलट सर्वसामान्य लोकांसाठी 24 तास सेवा देवूनही मी माझ्या कुटुंबासोबतही वेळ घालवतो’. (हे वाचा: करीनाने शेयर केला बालपणीचा क्युट PHOTO; आई आणि बहिणीसोबत देतेय पोझ   ) करियर आणि सामजिक कार्यांमध्ये संतुलन – सोनू सूदनं म्हटलं आहे, की सामाजिक कार्य हा माझ्या कार्याचाचं विस्तार आहे, यात वेगळं असं काहीच नाहीय. मी ज्या पद्धतीने माझ्या पर्सनल आणि प्रोफेशन लाईफमध्ये संतुलन ठेवतो. त्याचंप्रमाणे मी सामजिक कार्यांमध्येसुधा संतुलन ठेवतो. हे सर्व आत्ता माझ्या आयुष्याचाच भाग आहे. (हे वाचा: HBD: प्रियांकाच्या ‘मिस वर्ल्ड’ ड्रेसला चिकटवलं होतं टेपने; वाचा तो किस्सा ) कोरोना काळात सोनूने केलेल्या कार्यामुळे लोक त्याला आत्ता सुपरहिरो म्हणून बघत आहेत. आणि अर्थातच त्याला चित्रपटांमध्ये बघण्यासाठी खुपचं उत्सुक आहेत. याबद्दल बोलताना सोनू म्हणतो. ‘मला माझ्या प्रोफेशनल लाईफबद्दल प्रेम आहे. मला आत्ता अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळत आहेत. त्या माझ्या आयुष्यापेक्षाही मोठ्या आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की मी सर्वच भूमिका करेन. सोनू पुढे म्हणतो, ‘मी भूमिका तेव्हाचं करतो. जेव्हा मी पूर्णपणे त्या भुमिकेच्या प्रेमात पडतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या