मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

HBD: प्रियांकाच्या 'मिस वर्ल्ड' ड्रेसला चिकटवलं होतं टेपने; वाचा थक्क करणारा किस्सा

HBD: प्रियांकाच्या 'मिस वर्ल्ड' ड्रेसला चिकटवलं होतं टेपने; वाचा थक्क करणारा किस्सा

सन 2000 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेदरम्यान प्रियांका चोप्रा वार्डरोब मालफंक्शनला बळी पडली होती.

सन 2000 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेदरम्यान प्रियांका चोप्रा वार्डरोब मालफंक्शनला बळी पडली होती.

सन 2000 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेदरम्यान प्रियांका चोप्रा वार्डरोब मालफंक्शनला बळी पडली होती.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 18 जुलै- बॉलिवूडची (Bollywood) देसी गर्ल म्हणून अभिनेत्री प्रियांका चोप्राला (Priyanka Chopra) ओळखलं जातं. फक्त बॉलिवूडचं नव्हे तर हॉलिवूडमध्येसुद्धा प्रियांकाने आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे. ही देसी गर्ल आज एक ग्लोबल स्टार बनली आहे. आज प्रियांका निक जोनससाठी खुपचं खास दिवस आहे. कारण आज ती आपला 39 वा वाढदिवस (39 Birthday Today) साजरा करत आहे. पद्मश्री पुरस्कार विजेती प्रियांकाने 2000 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. यामध्ये तिने खुपचं सुंदर असा ड्रेस घातला होता हे सर्वांनाचं माहिती आहे, मात्र तिच्या या ड्रेसला चिकट टेपने चिकटवण्यात आलं होतं. जाणून घेऊया तिचा हा आश्चर्यकारक किस्सा...

अभिनेत्री प्रियांका चोप्राचा जन्म 18 जुलै 1986 मध्ये जमशेदपूर याठिकाणी झाला आहे. प्रियांकाने मोडेलिंगपासून आपल्या करीयरची सुरुवात केली होती. आज ती बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत सर्वात पुढे आहे. ती फक्त बॉलिवूडचं नव्हे तर हॉलिवूडमध्येसुद्धा तितकीच लोकप्रिय झाली आहे. प्रियांकाला एक ग्लोबल स्टार म्हणून ओळखलं जातं.

सन 2000 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेदरम्यान प्रियांका चोप्रा वार्डरोब मालफंक्शनला बळी पडली होती. या गोष्टीचा खुलासा स्वतः प्रियांकाने केला आहे, तिनं म्हटलं होतं, की यावेळी स्वतः ला जिंकवण्यासाठी खुपचं चालाकीने तिने हे सर्व सांभाळून घेतलं होतं. प्रियांकाने आपल्या एका मुलाखतीदरम्यान आपल्या सर्वात अस्वस्थ करणाऱ्या ड्रेसबद्दल सांगताना या गोष्टीचा खुलासा केला होता.

(हे वाचा:HBD: वडील मंत्री तर आई समाजसेविका, तरीही संघर्षात गेलं भूमी पेडणेकरचं बालपण )

पूर्ण ड्रेसला चिकट टेपने चिकटवण्यात आलं होतं-

प्रियांका चोप्राने वयाच्या 18 व्या वर्षी  मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर केला होता. यावेळी घातलेल्या ड्रेसबद्दल सांगताना तिनं म्हटलं होतं, की हा ड्रेस माझ्यावर टेप करण्यात आला होता. सुरुवातीला मला वाटलं सर्वकाही ठीक होतं आहे. मात्र मुकुट जिंकण्याच्यावेळी खुपचं अडचण झाली, कारण माझा ड्रेसला लावलेला टेप पूर्णपणे बाहेर आला होता.

(हे वाचा: Kriti Sanon ठरतेय स्टाईल आयकॉन; लेटेस्ट Photos पाहून मिळेल फॅशन इन्स्पिरेशन)

नमस्कार पद्धतीने वाचवलं-

प्रियांकाने म्हटलं होतं, की ती जेव्हा रम्प वॉक करत तेव्हा तेव्हा ती समोर हात जोडून नमस्कार करत असे, सर्वांना वाटत होतं की मी फक्त नमस्कार करत आहे, पण नाही त्यावेळी मी माझ्या ड्रेसलासुद्धा निसटण्यापासून वाचवत होते.

First published:

Tags: Bollywood, Priyanka chopra