मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

करीनाने शेयर केला बालपणीचा क्युट PHOTO; आई आणि बहिणीसोबत देतेय पोझ

करीनाने शेयर केला बालपणीचा क्युट PHOTO; आई आणि बहिणीसोबत देतेय पोझ

 बॉलिवूडची(Bollywood) बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर(Kareena Kapoor) सध्या चित्रपटांप्रमाणेचं सोशल मीडियावरसुद्धा सक्रीय असते.

बॉलिवूडची(Bollywood) बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर(Kareena Kapoor) सध्या चित्रपटांप्रमाणेचं सोशल मीडियावरसुद्धा सक्रीय असते.

बॉलिवूडची(Bollywood) बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर(Kareena Kapoor) सध्या चित्रपटांप्रमाणेचं सोशल मीडियावरसुद्धा सक्रीय असते.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 18 जुलै- बॉलिवूडची (Bollywood) बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) सध्या चित्रपटांप्रमाणेचं सोशल मीडियावरसुद्धा सक्रीय असते. ती सतत आपले नवे तसेच जुने फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेयर करत असते. करीना फक्त आपलेच नव्हे तर पती सैफ अली खान मोठा मुलगा तैमुर आणि आत्ता छोटा मुलगा जेहच्यासुद्धा पोस्ट शेयर करत असते. तसेच बऱ्याचवेळा ती बहीण करिश्मासोबतचे बालपणीचे फोटोसुद्धा शेयर करत असते. नुकताच करीनाने सोशल मीडियावर आपला एक जुना फोटो शेयर (Share Childhood Photo) केला यामध्ये ती आई बबिता आणि बहीण करिश्मासोबत दिसून येत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने विविध भूमिका साकारून चाहत्यांना आपलं वेड लावलं आहे. करीनाही कपूर कुटुंबांतील मुलगी आहे, त्यामुळे अभिनयाचा वारसा तिला जन्मताच मिळाला आहे. करीना आणि बहीण करिश्मासुद्धा अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. करीना बहीण करिश्माच्या खुपचं जवळ आहे. या दोघींमद्ये खुपचं घट्ट नातं आहे. सतत या दोघी एकमेकांसोबत दिसून येतात. या दोघीही आपल्या प्रत्येक गोष्टी एकमेकांशी शेयर करत असतात.

(हे वाचा: KGF Chapter 2 च्या टीजरने बनवला नवा रेकॉर्ड; मिळाले तब्बल इतके व्यूज)

नुकताच करीनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या बालपणीचा एक खास फोटो शेयर केला आहे. यामध्ये तिच्यासोबत आई बबिता आणि बहीण करिश्मासुद्धा आहे. या फोटोमध्ये तिघींच्याही चेहऱ्यावर खुपचं आनंद दिसत आहे. करीनाने हा फोटो शेयर करत याला अनोख कॅप्शनही दिलं आहे, कॅप्शन देत तिनं म्हटलं आहे, ‘काय ख्रिसमस आधीपासूनचं आहे’ या तिघींचा हा फोटो जवळजवळ 80 च्या दशकातील आहे. करीनाच्या या फोटोवर तिची ननंद सबा पतौडीने ‘माशाअल्लाह’ असं म्हटल आहे. तर करिश्मानेसुद्धा हार्ट इमोजी शेयर करत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Kareena Kapoor