मुंबई, 7 मे : गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा कोरोनाने (Coronavirus) थैमान घातला आहे. आरोग्यासोबतचं लोकांना आर्थिक संकटांना सुद्धा समोर जावं लागत आहे. बॉलिवूडचं सुद्धा काम ठप्प झालं आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील रोजंदार कामगारांना (Bollywood Daily wages Workers) याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. आत्ता या कामगारांच्या मदतीसाठी सलमान खानने (Salman Khan) धाव घेतली आहे. यावर्षी सुद्धा सलमानने मनोरंजन सृष्टीतील 25 हजार रोजंदार कामगारांना आर्थिक मदत करण्याचा विडा उचलला आहे. या प्रत्येक कामगारांच्या खात्यात सलमान 1500 रुपये पाठवणार आहे. ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सिने एम्प्लोइज’(FWICI) चे महासचिव अशोक दुबे यांनी नुकताच इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधला होता. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ सलमान खान यांच्या मॅनेजरने FWICI चे अध्यक्ष बीएन तिवारी यांच्याशी याबाबतीत संवाद साधला आहे. आणि आमच्याकडून 25 हजार रोजंदार कामगारांच्या बँक डीटेल्स मागविल्या आहेत. सलमान या प्रत्येकांच्या खात्यावर 1500 रुपये पाठवणार आहे. गेल्यावर्षी सुद्धा त्यांनी अशी मदत केली आहे. ( हे वाचा: खतरों के खिलाडी’ निघाले आफ्रिकेला; कोरोनाशी लढा देत करणार चित्तथरारक स्टंट ) तसेच अशोक दुबे यांनी म्हटलं आहे, आम्हाला याबद्दल काहीही अंदाजा नव्हता. कारण डिसेंबर पासून काम सुरु झालं होतं. आणि फेब्रुवारीपर्यंत सर्वांना काम देखील मिळालं होतं. त्यामुळे सर्व लोक आनंदात होते. मात्र त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली. आणि परत सर्वांचं काम बंद झालं. आत्ता अंदाज लावणं सुद्धा कठीण आहे. की कधी हे सगळं ठीक होईल. आणि कधी सर्वांना परत काम मिळेल. (हे वाचा: #InThisTogether: कोव्हिडग्रस्तांसाठी विरुष्काचा मदतीचा हात, उभारणार 7 कोटी ) मात्र गेल्यावेळी प्रमाणे यावेळीसुद्धा सलमानने रोजंदार कामगारांसाठी धाव घेतली आहे. गेल्यावर्षी इतर उद्योगांप्रमाणे बॉलिवूडला सुद्धा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. काही महीन्यांपासून सर्व सुरळीत होत होतं. मात्र दुसऱ्या लाटेने पुन्हा सर्व हिरावून घ्यायला सुरुवात केली आहे.