JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Captain India: कार्तिक आर्यनने केली नव्या चित्रपटाची घोषणा; अभिनेता बनणार PILOT

Captain India: कार्तिक आर्यनने केली नव्या चित्रपटाची घोषणा; अभिनेता बनणार PILOT

अभिनेता कार्तिक आर्यनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक पोस्ट शेयर केली आहे. यामध्ये त्याने आपल्या आगामी चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जुलै- अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आज तरुणाईच्या गळयातील ताईत बनला आहे. खुपचं कमी वेळेत कार्तिकला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. या लाडक्या अभिनेत्याने नुकताच आपल्या आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वांनाचं सुखद धक्का बसला आहे. कारण या चित्रपटाची जरासुद्धा भनक कोणाला नव्हती. आणि आज अचानक या चित्रपटाचा पोस्टर शेयर (New Poster) करत, कार्तिकने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. पोस्टरमधील पायलटच्या रुपात कार्तिक खुपचं कूल दिसत आहे.

संबंधित बातम्या

अभिनेता कार्तिक आर्यनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक पोस्ट शेयर केली आहे. यामध्ये त्याने आपल्या आगामी चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलं आहे. यामध्ये तो एका पायलटच्या (कॅप्टन) लुकमध्ये दिसून येत आहे. त्याचा चेहरा तर दिसत नाहीय. कारण कार्तिकचा चेहरा टोपीमध्ये झाकला गेला आहे. मात्र काही घरे आणि विमाने दिसून येत आहेत. कार्तिकच्या या चित्रपटाचं नाव ‘कॅप्टन इंडिया’ असं आहे. पोस्टर रिलीज होताचं कार्तिकवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. कार्तिकने या पोस्टरला कॅप्शन देत म्हटलं आहे, ‘जेव्हा एक कॅप्टन आपल्या ड्युटीपेक्षाही पुढे निघून जातो. मोठ्या अभिमानाने आणि सन्मानाने तुमच्या साठी घेऊन आलो आहोत कॅप्टन इंडिया’ अशा आशयाचं त्याचं कॅप्शन आहे. (हे वाचा: कपिल शर्मा शोमधून सुमोना बाहेर? एका एपिसोडसाठी घेत होती तब्बल इतके पैसे ) मात्र चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल कार्तिकने अजून कोणतीही माहिती देलेली नाही. या चित्रपटाचं दिग्दर्शन हंसल मेहता हे करत आहेत. नुकताच त्यांच्या ‘स्कॅम 1992’ या चित्रपटाने धम्माल केली होती. हा चित्रपट खुपचं लोकप्रिय झाला होता. तसेच कार्तिक आर्यनने नुकताच आपल्या ‘सत्यनारायण की कथा या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यांनतर तो आणखी एका चित्रपटासाठी रोहित धवनसोबत मिटिंग करत आहे. त्याला नुकताच रोहितच्या ऑफिसबाहेर पाहण्यात आलं होतं. तेथे तो ‘शहजादा’ या चित्रपटाच्या मिटिंगसाठी गेला होता. सध्या कार्तिक आर्यन अनेक चित्रपटांमधून आपल्या भेटीला येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या