मुंबई, 23 जुलै- छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) पुन्हा एकदा आपलं मनोरंजन करण्यसाठी सज्ज झालं आहे. नुकताच नव्या शोचा प्रोमो रिलीज झाला आहे. मात्र यामध्ये भुरीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarty) दिसून येत नाहीय. तसेच सेटवरील कलाकारांच्या लसीकरण आणि अन्य फोटोंमधूनसुद्धा सुमोना गायब आहे. यावरून सुमोना या शोमध्ये दिसणार नसल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.
आपल्या अचूक विनोदी बुद्धीने आणि निरागस विनोदाच्या जोरावर कपिल शर्मा शोला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यामध्ये सुमोनाचासुद्धा महत्वाचा वाटा आहे. शोमध्ये कपिल प्रत्येकवेळी सुमोनाची चेष्टा करत. आणि ती त्याला मजेशीर अंदाजात त्याला प्रत्युत्तर करत. दोघांचा हा अंदाज चाहत्यांना खुपचं पसंत पडत असे. त्यामुळे सुमोना शोमध्ये नाही दिसणार हा अंदाज जर खरा असेल, तर चाहत्यांना खुपचं निराशा होणार असल्याचं म्हटलं जातं आहे. सुमोना या शोमध्ये दिसणार नसल्याच्या अंदाजाला जोर तेव्हा चढला जेव्हा कपिलने आपल्या टीमच्या लसीकरणाचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले होते. यामध्ये कपिलचे जुने सहकारी भारती, कीकू शारदा आहेत. मात्र सुमोना फोटोमधून गायब आहे. त्यानुळे हा अंदाज वर्तवला जातं आहे.
मध्यंतरी लॉकडाऊनमध्ये सुमोनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करून, आपल्याकडे काम नसल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर शोची घोषणा झाल्यानंतरही तिने एक पोस्ट केली होती. त्यामधून तिला चान्स न मिळाल्याचं दुख वाटत असल्याचं जाणवत होतं. तसेच सुमोनाच्या आणखी एका पोस्टवर युजरने शो सोडलं आहे का असा प्रश्न विचारला होता. (हे वाचा: राज कुंद्रा केसमध्ये शर्लिन चोप्राचा VIDEO व्हायरल; केला धक्कादायक खुलासा ) एका एपिसोडसाठी घेते इतकी रक्कम- मीडिया रिपोर्टनुसार सुमोना एका एका आठवड्यासाठी जवळजवळ 4 ते 6 लाख रुपये घेत होती. तर तिच्या इतर सहकाऱ्यांना 5 लाख एका एपिसोडसाठी मिळत होते. मात्र सुमोनाच्या म्हणण्यानुसार, ‘तिचं जितकं काम आहे. त्या हिशोबाने ही रक्कम अगदी व्यवस्तीत आहे, आणि ती यामध्ये समाधानी आहे’. मीडिया रिपोर्टनुसार ‘द कपिल शर्मा शो’ 12 ऑगस्टपासून आपल्या भेटीला येणार आहे.