JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss Marathi 3: पहिल्याच दिवशी मीराचा तुफान राडा, कोण होणार नॉमिनेट? पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 3: पहिल्याच दिवशी मीराचा तुफान राडा, कोण होणार नॉमिनेट? पाहा VIDEO

आता आज सोमवारपासून खऱ्या खेळाला सुरुवात होणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहिल्याच दिवशी मीरा आणि जयमध्ये भांडण सुरू झालं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 सप्टेंबर : कलर्स मराठीवरील बहुप्रतिक्षित शो बिग बॉस मराठीचा सीजन 3 सीजन (Bigg Boss Marathi 3) सुरू झाला आहे. 19 सप्टेंबर रोजी 14 स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली. या सीजनमध्ये नेमके कोणते सेलिब्रिटी येणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. अखेर रविवारी सर्व स्पर्धकांची नावं समोर आलं. स्नेहा वाघ, मीनल शाह, अक्षय वाघमारे, मीरा जगन्नाथ, विकास पाटील, सुरेखा कुडची, गायत्री दातार, तृप्ती देसाई, सोनाली पाटील, जय दुधाणे, उत्कर्ष आनंद शिंदे, शिवलीला बाळासाहेब पाटील, अविष्कार दारव्हेकर, संतोष चौधरी या स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात धमाकेदार एन्ट्री झाली. 100 दिवस एकत्र राहताना स्पर्धकांमध्ये झालेले वाद यापूर्वीच्या सीजनमध्ये चांगलेच गाजले होते. आता आज सोमवारपासून नव्या तिसऱ्या सीजनच्या खऱ्या खेळाला सुरुवात होणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहिल्याच दिवशी मीरा आणि जयमध्ये भांडण सुरू झालं, तर मीरा आणि स्नेहामध्येही चांगलीच बाचाबाची झाल्याचं आजच्या भागात पाहायला मिळेल. बिग बॉसमध्ये गेम खेळताना झालेला वाद, तसचं एकमेकांशी न जमल्याने झालेला वाद आता चांगलाच रंगणार आहे. घरामध्ये झालेला वाद असो वा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झालेली पहिली नॉमिनेशन प्रक्रिया असो सगळेच चर्चेत असणार आहे. मीरा आणि स्नेहामध्ये तसंच मीरा आणि जयमध्ये वाद कशा नेमका कशावरुन झाला? पुढे काय झालं? गेम सुरू झाल्यावर काय काय घडतं? हे सर्व आजच्या भागात समोर येणार आहे. Bigg Boss Marathi 3 Live : आतापर्यंतचा सर्वात मोठा धमाका; तृप्ती देसाईची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

संबंधित बातम्या

पहिल्या नॉमिनेशनने खऱ्या लढाईची सुरुवात होणार आहे. सदस्यांचा पहिला दिवस कसा होता? पहिल्या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये कोण कोण नॉमिनेट झालं? हे बघणे रंजक ठरणार आहे. ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर झाल्यानंतर दररोज रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांना हा शो पाहता येणार आहे. शंभर दिवस वेगवेगळ्या क्षेत्रातील 15 सेलिब्रिटी ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र बंदिस्त होतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या